🌟नांदेड जिल्ह्यात होळी/रंगपंचमी सना दरम्यान दोन दिवसांत ३ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त...!


🌟जिल्ह्यातील भरारी पथकाने १४ व १५ मार्च रोजी जिल्ह्यात एकूण १८ कारवाया केल्या🌟

नांदेड : नांदेड जिल्ह्यात होळी धुलिवंदनाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी १४ मार्च रोजी किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीस कोरडा दिवस घोषित करण्यात आला होता. या काळात अवैध मद्याची वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणात शक्यता नाकारता येत नसल्याने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील भरारी पथकाने १४ व १५ मार्च रोजी जिल्ह्यात एकूण १८ कारवाया केल्या.

यात एकूण १८ गुन्हे, वारस १८, अटक आरोपी १८, रसायन २००, देशी मद्य ७१.६४ लि, विदेशी मद्य १.८० लि, ताडी ६११ लि, जप्त वाहन संख्या २ असा एकूण ३ लाख १८ हजार ६०५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे.

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली जावेद कुरेशी, आशिष महिंद्रकर, लक्ष्मण पाटील, सर्व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, सचिन शेट्टे, कार्यकारी दुय्यम निरीक्षक शिवदास कुबडे, उत्पादन शुल्क विभाग यांनी कार्यवाहीत भाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या