🌟आधार प्रमाणिकरण ई-केवायसीची मुद्दत ३१ मार्च : पाच दिवसांचा कालावधी बाकी अद्यापही दुकानदारांची ई-केवायसी इनकॉम्प्लेट🌟
आधार प्रमाणिकरण ई-केवायसीची अंतिम मुद्दत ३१ मार्च २०२५ ही असतांना आधार प्रमाणिकरण ई-केवायसी करण्यासाठी अवघ्या पाच दिवसांचा कालावधी बाकी असतांना देखील पुर्णा तालुक्यात केवळ ७४.६३ टक्के ई-केवायसी झाल्याचे तालुका पुरवठा अधिकारी श्री नाईक यांनी कळवले आहे तालुक्यातील शिधापत्रिका धारकांमध्ये आधार प्रमाणिकरण ई-केवायसी संदर्भात तालुका पुरवठा विभागाने तालुक्यातील ९९ गावांतील ताडकळस,कान्हेगाव,कानडखेड या तीन गावांमध्येच जनजागृती कॅम्प घेतले त्यामुळे अनेक गावांतील शिधापत्रिका धारक नागरिकांना आधार प्रमाणिकरण ई-केवायसी करणे किती अनिवार्य आहे याची जाणीव झाली नाही तर याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे तालुक्यातील ११५ ज्यात शहरातील १६ शासकीय स्वस्त धान्य दुकानदार व उर्वरित ग्रामीण भागातील ९९ शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांनी या आधार प्रमाणिकरण ई-केवायसीचा फायदा घेऊन शिधापत्रिका धारकांना आपण ई-केवायसी केली नाही त्यामुळे धान्य मिळणार नाही असे म्हणून मोठ्या प्रमाणात शासकीय स्वस्त धान्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचे प्रकार देखील अनेक महाभागांनी केल्याचं समोर आल आहे.
पुर्णा तालुक्यात एकूण ११५ परवानाधारक शासकीय स्वस्त धान्य दुकानदार असून यात पुर्णा शहरात १६ व ग्रामीण भागात ९९ शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांचा समावेश आहे तर एकूण शिधापत्रिका धारकांची संख्या ०१ लाख २६ हजार ४३६ येवढी असून यातील ९४ हजार ३६७ शिधापत्रिका धारकांनी आधार प्रमाणिकरण ई-केवायसी केली असून अद्यापही ३२ हजार ०६९ शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी झालेली नाही त्यामुळे ३२०६९ शिधापत्रिका धारक आपल्या हक्काच्या शासकीय स्वस्त धान्याला मुकणार की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून शासनाच्या आधार प्रमाणिकरण ई-केवायसीचा देखील अनेक शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांनी गैरफायदा घेऊन आपले हात ओले करुन घेतल्याचे समोर आले आहे.
💫शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांना प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेच्या आत शिधापत्रिका धारकांना धान्यवाटप करणे अनिवार्य :-
शासकीय नियमानुसार शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांनी शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे शासकीय स्वस्त धान्य कोणत्याही परिस्थितीमध्ये दर महिन्याच्या १५ तारखे पूर्वी वाटप करावे अशे सक्तीचे आदेश शासनाने दिलेले असतांनाच पुर्णा शहरासह तालुक्यातील अनेक शासकीय स्वस्त धान्य दुकानदार विविध कारण दाखवून महिन्याच्या अखेरपर्यंत धान्याचे वाटप करीत नाहीत काही दुकानदार तर असेही आहेत जे शिधापत्रिका धारकांना त्याचे अंगठे घेत धान्य दिल्याचा बनाव करुन त्यांना चार चार महिने शासकीय स्वस्त धान्यापासून वंचित ठेवून हा शासकीय स्वस्त धान्याचा साठा राशन माफियांच्या घशात घालण्याचे निचकृत्य करतात यावरुन असे निदर्शनास येते की पुरवठा अधिकाऱ्यांचे या शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनागोंदी कारभारावर कसल्याही प्रकारचे नियंत्रण नाही.
💫शासकीय स्वस्त धान्याचा काळा कारभार रोखण्यासाठी शासकीय स्वस्त धान्य दुकानासमोर शिधापत्रिका धारकांच्या उपस्थितीत चावडी वाचन आवश्यक :-
पुर्णा शहरासह तालुक्यातील शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांकडून शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी व शासकीय स्वस्त धान्य प्रणालीचा कारोबार सुधारण्यासाठी तसेच गोरगरीब शिधापत्रिका धारकांच्या हक्काच्या शासकीय स्वस्त धान्याचा होणारा काळा कारभार रोखण्यासाठी परभणी जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील ११५ शासकीय स्वस्त धान्य दुकानासमोर शिधापत्रिका धारकांच्या उपस्थितीत चावडी वाचनाचा कार्यक्रम युध्दपातळीवर राबवणे देखील आता अत्यावश्यक झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब शिधापत्रिका धारक भविष्यात आपल्या हक्काच्या शासकीय स्वस्त धान्यापासून वंचित राहणार नाही अशी मागणी देखील आता शिधापत्रिका धारकांकडून होत आहे......
0 टिप्पण्या