🌟शिवसेना उबाठा गटाचे नेते आ.अनिल परब यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विधान परिषदेत प्रचंड गदारोळ....!


🌟विधिमंडळातील कामकाज अनेकवेळा तहकूब : वादग्रस्त वक्तव्यावर सत्ताधारी आक्रमक🌟 

मुंबई :- शिवसेना उबाठा नेते अनिल परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना काल केलेल्या बेताल व वादग्रस्त वक्तव्याचे विधान परिषदेत आज शुक्रवार दि.०७ मार्च रोजी तीव्र पडसाद उमटले यावेळी राज्यातील सत्ताधारी महायुतीतील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चांगलेच आक्रमक दिसून आले. याच दरम्यान आ.अनिल परब व मंत्री नितेश राणे यांच्यातील वाकयुद्धामुळे सत्ताधारी आणि विरोधकांत शब्दयुद्ध रंगले. त्यामुळे विधान परिषदेचे कामकाज वारवार तहकूब करावे लागले.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशी विधान परिषदेत शिवसेना आ. अनिल परब यांनी काल राज्यपालांच्या अभिभाषणावर केलेल्या भाषणात वादग्रस्त विधानाचा सत्ताधारी बाकांवरुन खरपूस समाचार घेण्यात आला. गुरुवारी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेत ठाकरे गटाचे आ. अनिल परब यांनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी त्यांच्यावरील ईडी कारवाईची माहिती देताना छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना केली आहे. यामुळे आज सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आजचे कामकाज सुरु होण्याअगोदरच भाजप आ.प्रवीण दरेकर आणि आ.चित्रा वाघ यांच्या नेतृत्वामध्ये सत्ताधारी पक्षाच्यावतीने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी अनिल परब यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. तसेच आ. अनिल परब यांनी माफी देखील मागवी अशी मागणी आ. प्रवीण दरेकर यांनी केली आहे. आ. अनिल परब यांच्या वक्तव्याचा निषेध करताना भाजप आ. दरेकर म्हणाले की, अनिल परब यांनी स्वतःची तुलना संभाजी महाराजांशी केलेली आहे. त्याच्या या विकृत मानसिकतेचा आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या परबांचा आम्ही धिक्कार करतो. काल सभागृहात बोलले छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी छळ होतोय, असं बोलून त्यांनी छत्रपती महाराजांशी तुलना केली, असे मत प्रवीण दरेकर यांनी केले आहे. त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल सभागृहात जाहीर माफी मागावी, परब याचं निलंबन करावं अशी आमची मागणी आहे, अबू आझमीप्रमाणे अनिल परब यांच्या निलंबनासाठी १०० टक्के आग्रही आहोत. नाक्यावरची भाषा सभागृहात बोलून चालणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे यावर ठाकरे गटाचे आ. अनिल परब म्हणाले की, माझ्यावरती अन्याय आणि अत्याचार झाले ते मी माझ्या भाषणात मांडले. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा वारसदार आहे. त्यामुळे मी त्यांचा अवमान करण्याचा प्रश्नच येत नाही असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. या चर्चेत भाग घेताना मंत्री नितेश राणे यांनी आ. परब यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. या टीकेला आ.परब यांनी त्याच पध्दतीने उत्तर दिले. त्यामुळे सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. याच विषयावर गरमागरम चर्चा सुरु असतांना आरोप-प्रत्यारोप होत होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या