🌟जिल्हाधिकारी गावडे यांनी नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी संपर्क साधण्याचे केले आवाहन केले🌟
मुख्यमंत्री सचिवालय, मुंबईच्या परिपत्रकानुसार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये दाखल झालेल्या अर्जांचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईकांना मंत्रालयात जाण्याची गरज भासत होती. ही प्रक्रिया सोपी करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावरच सहाय्यता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झालेल्या या कक्षात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून तो पूर्णतः कार्यान्वित आहे. जिल्ह्यातील नागरिकांना दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी आणि आपत्ती प्रसंगी आर्थिक मदतीसाठी या कक्षाचा लाभ घेता येईल यासंदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
*-*-*-*-*
0 टिप्पण्या