🌟मॅसिडोनियाच्या कोकानी शहरातील नाइट क्लबला आग....!


🌟आगीत ५१ ठार तर  १०० जन जखमी🌟

मॅसिडोनिया : मॅसिडोनियाच्या कोकानी शहरातील एका नाइट क्लबमध्ये शनिवारी भीषण आग लागली. या आगीत ५१ जणांचा होरपळून मृत्यू, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आसपासच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत.

 या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी दाखल झाले. या जखमींपैकी अनेकांची स्थिती नाजूक असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर गृहमंत्री पांसे तोशकोवस्की यांनी मृत व जखमींची आकडेवारी, तसेच त्यांच्यावरील उपचारांची माहिती दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या