🌟बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच सूत्रधार...!


🌟सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील तपास यंत्रणांचा आरोपपत्रात खुलासा🌟

बिड : बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा खरा सुत्रधार वाल्मिक कराडच असल्याचा उल्लेख सीआयडी, एसआयटी या तपास यंत्रणांच्यावतीने केज न्यायालयात दाखल झालेल्या आरोप पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात गेले आहेत.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निघृण हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला हे प्रकरण पोलीसांकडून दावण्याचा प्रयत्न झाला. परंतु सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी या प्रकरणी विधिमंडळात या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास सुरुवातीला सीआयडी नंतर सीबीआयकडे सोपवला. त्याचप्रमाणे या प्रकरणात एसआयटीसह न्यायालयीन चौकशी सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणापूर्वी भागात कार्यरत पवन उर्जा कंपनी असलेल्या आवादा कडून २ कोटींची खंडणी मागण्यात आली होती. आवादाचा हा प्रकल्प मस्साजोग परिसरात उभारण्यात आला आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन चाटे यांच्या सहकाऱ्यांनी खंडणीसाठी आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकास मारहाण केली होती. त्यावेळी झालेल्या वादात गावचे सरपंच म्हणून सुरक्षा रक्षकाच्या मदतीला संतोष देशमुख धावून गेले होते. खंडणी प्रकरणात संतोष देशमुख अडथळा निर्माण करीत असल्याने त्यांचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला. सुरुवातीला वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचाही आरोप लावण्यात आला. पोलीसांनी याप्रकरणी वाल्मिक कराडसह ९ जणांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात एकूण ९ आरोपी पोलीसांच्या ताब्यात आहेत.

८० दिवसांच्या तपासानंतर सीआयडीने १८०० पानांचे आरोपपत्र ९ आरोपींविरुध्द केज न्यायालयात दाखल केले आहे. यात वाल्मीक कराड या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचे सीआयडीने म्हटले आहे. सीआयडीच्या आरोपपत्रानुसार सुदर्शन घुले, वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये हत्येच्या दिवशी आणि त्याआधी जे संभाषण झाले, नेमके काय बोलणे झाले, संतोश देशमुख यांची हत्या कशी झाली ? त्याची माहिती सीआयडीच्या आरोपपत्रातून देण्यात आली आहे. तसेच, संतोष देशमुख यांना मारहाण करताने जे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले ते सीआयडीच्या हाती लागले आहे. संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपी दिसत आहेत, ते पुरावे सीआयडीने आरोपपत्रात जोडले आहेत. वाल्मीक कराडला अवादा कंपनीकडून २ कोटी रुपये खंडणी उकळायची होती. पण त्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून वाल्मीक कराडने हत्येचे कारस्थान रचले. हत्येमागचे हेच कारण असल्याच सीआयडीच्या आरोपपत्रात म्हटले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या