🌟नागरिकांच्या तक्रारी सार्वजनिक समस्यांचे आता वेळीच निवारण होणार🌟
मुंबई : राज्यातील नागरिकांच्या तक्रारी सार्वजनिक समस्यांचे आता वेळीच निवारण होणार आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांच्या आधारे वेळीच निवारण करण्यात येणार आहे नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांविषयी विविध माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाद्वारे विविध माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या शासनविषयीच्या महत्त्वपूर्ण बातम्यांची दखल घेऊन त्याद्वारे शासनाची कार्यक्षमता वाढवून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिली.
प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या विभागांकडून तत्काळ दखल घेण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी, समस्यांच्या निराकरणासाठी मदत होणार आहे. कार्यक्षम सेवा, वितरण यंत्रणा, समस्यांचे जलद निराकरण करणे याकरिता माध्यमांमधून प्रसिद्ध होणारी माहिती तथा बातम्यांची महत्त्वपूर्ण मदत घेता येणार आहे.
✍️सरकारविषयक विविध माध्यमावर प्रसारित होणाऱ्या वृत्ताची दखल सरकारने घेतली....✍️
🔴असे होणार काम...
■ माध्यमांशी संवाद वाढविणे
■ नागरिक-शासन दुवा मजबूत
■ पारदर्शक संवाद प्रक्रिया राबविणे
■ नियमित माहितीची देवाण-घेवाण
🔴अशी असेल कार्यपद्धती...
■ प्रत्येक विभागात नोडल अधिकारी
■ बातम्यांची त्वरित दखल
■ साप्ताहिक कृती अहवाल
■ मासिक पुनर्विलोकन बैठक
0 टिप्पण्या