🌟मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा...!

 


🌟मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटल यांची मागणी🌟

जालना : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवलेल्या बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या प्रकरणातून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप देखील जरांगे पाटील यांनी केला आहे.

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड न्यायालयात कालपासून सुनावणी सुरु झाली आहे. याविषयी बोलतांना मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज एक पत्रकार परिषद घेवून पुन्हा एकदा धनंजय मुंडे व आ.सुरेश धस यांना लक्ष केले आहे. ते म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारचे काही प्रतिनिधी घुसले आणि त्यांनी धनंजय मुंडे यांना वाचवलं आहे. त्यांनी हे डोक्यावर घेतलेलं पाप आहे, त्याचे परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावे लागेल, धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात ही बैठक झाली, त्याच्यानंतर खंडणी अपहरण आणि खून धनंजय मुंडे यांनी घडवून आणला. त्यामुळे ३०२ मध्ये धनंजय मुंडे आरोपी होतात आणि झालाच पाहिजे, गृहमंत्र्यांनी त्यांना - आरोपी करावे, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली आहे. सत्य कधीच झाकत नाही, तुम्ही किती - प्रयत्न केले तरी नियतीला मान्य नसतं. त्या लोकांनी कोणासाठी केलं तर ते धनंजय मुंडे यांच्यासाठीच - असे म्हणत आ. धस यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. खंडणीतून मिळालेला पैसा धनंजय मुंडेंना दिला - जायचा. हत्याप्रकरणातील १ नंबरचा आरोपी टोळी तयार करून अशी कृती करत होता. एक नंबरच्या आरोपीनेच खंडणीसाठी खून करायला लावल्याचं सिद्ध झाल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या