🌟भारतीय बौद्ध महासभा पुर्णा शहर कार्यकारिणी जाहीर.....!


🌟पुर्णा शहराध्यक्ष पदावर कवी तथा गायक उमाजी बोराहटे यांची निवड🌟


पुर्णा (दि.१० मार्च २०२५) :- पुर्णा शहरात काल रविवार दि.०९ मार्च २०२५ रोजी भारतीय बौद्ध महासभा शहर कार्यकारणीची निवड परभणी जिल्हा भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष तुकाराम ढगे व पुर्णा तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.


यावेळी भारतीय बौद्ध महासभा पुर्णा शहराध्यक्ष पदावर प्रसिद्ध कवी तथा गायक उमाजी बोराहटे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश दादा कांबळे,माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते उत्तमभैया खंदारे,सामाजिक कार्यकर्ते राज नारायनकर,गिरिश एंगडे,सतिश नारायनकर,सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सोनकांबळे यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या