🌟पुर्णा नगर परिषदेच्या निर्लज्ज कारभाराला सर्वसामान्य कार्यकर्त्यांची चपराक : स्वखर्चातून केले पाणी वाटप....!


🌟पाणीटंचाई विरोधात पर्यायी व्यवस्था करण्यात मुख्याधिकारी यांच्यासह स्थानिक आजी/माजी लोकप्रतिनिधीही ठरले अकार्यक्षम🌟 


पुर्णा :- पुर्णा नगर परिषद पाणीपुरवठा विभागातील जॉकवेलवरील विद्युत मोटार नेहमीप्रमाणे जळाल्याने व अतिरिक्त विद्युत मोटार उपलब्ध नसल्यामुळे पुर्णा शहरातील सर्वसामान्य जनता नगर परिषद मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता किरण गुट्टे यांच्या अकार्यक्षम गुट्टेशाही कारभारामुळे मागील जवळपास दहा ते पंधरा दिवसापासून भीषण कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करीत असतांना या गंभीर बाबीकडे नगर परिषद पाणीपुरवठा विभागासह स्थानिक आजी/माजी लोकप्रतिनिधी धृतराष्ट्री भुमिका घेत 'मला काय त्याचे' या आवेशात वावरत कुठल्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था करीत नसल्याने पाण्याअभावी शहरातील नागरिकांसह माता भगिनींचे होणारें हाल पाहून सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अमोल पळसकर व सामाजिक कार्यकर्ते गोविंद ( राज ) ठाकर यांनी पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या निर्लज्ज कारभाराला चपराक देत चक्क स्वखर्चातून नागरिकांना मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली.

पुर्णा शहरातील तथाकथित जनहीतवादी समाजसेवक आजी/माजी लोकप्रतिनिधी संधिसाधू पुढारी 'तुका म्हणे उभे राहावे जे जे होईल ते ते पाहावे' या संतश्रेष्ठ तुकोबा राज्यांच्या ओवीचा अंगिकार करीत भिषण पाणीटंचाईच्या परिस्थितीत जनसामान्यांचे पाण्याअभावी होणारें हाल बघून न बघितल्याचे सोंग करीत असतांना कुठल्याही प्रकारची इन्कम नसतांना जनसामान्यांच्या हाल अपेष्टा न बघवल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे धाडसी युवा नेतृत्व गोविंद उर्फ राज ठाकर व सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व अमोल पळसकर यांनी आज सोमवार दि.१८ मार्च रोजी शहिद स.भगतसिंग चौक,डोबी गल्ली,नेहरु रोड परिसरात स्वखर्चाने खाजगी टॅंकर मागवून पाणीवाटप करण्यास सुरुवात केली त्यांच्या कौतुकास्पद उपक्रमाचे परिसरातील नागरिकांसह शहरातील विविध भागांतील नागरिकही कौतुक करीत असल्याचे आज पाहावयास मिळाले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या