🌟हिंगोलीचा आर्य वैश्य वधु-वर परिचय मेळावा सर्वांगसुंदर : उपवधू-उपवरांच्या प्रतिक्रिया.....!


🌟प्रशांत निलावार ह्यांना आर्यवैश्य राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार🌟    


हिंगोली (राज्यस्तरीय वृत्त विशेष) - हिंगोली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच आर्यवैश्य उपवधू -उपवर परिचय मेळावा सर्वार्थाने सर्वांगसुंदर ठरल्याच्या प्रतिक्रिया विवाह ईछुक उपवधू उपवर, पालक, अन् समाजभूषण उद्योगपती मा.प्रशांत व सौ.सीमा निलावार दांपत्त्या सह सर्वांनी  दिल्याने आयोजक सुद्धा भारावून गेले. हिंगोली  येथील श्री बालाजी मित्र मंडळा द्वारे २३ मार्चला  रविवारी  तिरुमला लॉन येथे एक दिवसीय अभूतपूर्व सर्वांगसुंदर आर्यवैश्य  उपवधू  उपवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्याबद्दल लाभार्थिनी ह्या प्रतिक्रिया दिल्या.


मेळाव्यात राज्यासह लगतच्या राज्यातील ही विवाह  इच्छुकांनी  सहभाग घेतला. मागील दोन महिन्यात पासून श्री बालाजी मित्र मंडळाचे सर्व विश्वस्त,आर्यवैश्य समाजातील दानदाते, महिला पुरुष, ज्येष्ठ नागरिक,तरुण तरुणी, सर्व समित्यांची  मंडळी,आदी सह मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी परिश्रम घेतल्याने हे अभूतपूर्व यश मिळाल्याचे थेट प्रतिक्रिया मुळे आम्ही भारावून गेलो अस मंडळाचे विश्वस्त गिरीश गुंडेवार ह्यांनी म्हंटले. आयोजक  बालाजीमित्र मंडळ  असले तरी  मेळावा हा सर्वांचाच सर्वसमावेशक दिसला,नियोजन, सादरीकरण,आत्मीयता पूर्वक वागणूक,निवास खानपान व्यवस्थापन आदी विविध बाबतीत नंबरवन आणि आदर्श ठरल्याची  अनुभूती आम्हांस झाली अस आमदार तानाजीराव मुटकुळे व आमदार संतोषराव बांगर ह्यांच्या सह सहभागि  नी बोलून मंडळाचे ही कौतुक केलं. वातानुकूलित व्यवस्थेतील आमरसाळीच पंचपक्वानाच भोजन,दिवसभर चहा ,कॉफी, पाणी,कैरी पन्हे,चिवडा,चाट ,रात्रीचे भोजन,स्मरणिका, मॉमेंटो, स्टेशनरी साहित्य आदीची रेलचेल मंडळाने केल्याने सर्वानंद झाला अशी प्रतिक्रिया समाजभूषण उद्योपती श्री प्रशांत निलावार व सौ.सीमा निलावार व समाजातील मान्यवरानी ही दिली.अत्याधुनिक  संगणकीय तंत्रज्ञानासह ,मंचावरील आकर्षक  रॅम्प वर येवून उपवधू ,उपवरानी परिचय दिला.ह्यात देशातील आणि विदेशातील उपवधू उपवर च्यां पालकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुसंवाद साधल्याने सातासमुद्रा पलीकडे सुद्धा श्री बालाजी मित्र मंडळाचा मेळावा जणू घरो घरी पोचवण्यात यश मिळालं.                          

🚩पहिला आर्यवैश्य राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार प्रदान :-          

हिंगोलीचे भूमीपुत्र देश विदेशात व्यवसायातून, सेवेतून पताका फड कवणारे दानशूर समाजभूषण श्री प्रशांत व सौ.सीमा निलांवार दांपत्यास मंडळा चा पहिला राष्ट्रीय आर्य वैश्य समाजरत्न पुरस्कार व मानपत्र आ.श्री तानाजीराव मुटकुळे  व आ.श्री संतोषराव बांगर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. हिंगोलीचे भूमीपुत्र प्रशांत निलांवार व सौ. सीमा निलांवार दाम्पत्याच्या   प्रगतीची उंची मोजता येणार नाही असे उत्तुंग  व्यक्तिमत्व आपल्या हिंगोली चे भूमिपुत्र आहेत  सर्व शक्तिमान आहेत ह्याचा सार्थ अभिमान आहे अश्या आशयाचे उदगार आमदार द्वयानी काढून  शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी त्यांचा सत्कार विश्वस्त गिरीश गुंडेवार  आणि सर्व विश्वस्तांनी केला.सत्कारास उत्तर देताना सौ.सीमाताईनी, पहिला आर्यवैश्य राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार मंडळाने दिला असला तरी आपल्या हिंगोली च्या मंडळा कडून मिळाल्याने आम्हां साठी हा आंतरराष्ट्रीय दर्ज्याचा आहे असे म्हणून मंडळाचे त्यांनी आभार मानले.कोरोना मधे मोफत होमिओ औषधी वितरण केल्याबद्दल डॉ.सुशिल गुंडेवार व रक्तदान नेत्रदान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याने अनेक पुरस्कार प्राप्त शिरीष गुंडेवार ह्यांचा सन्मान ह्याप्रसंगी करण्यात आला.हिंगोलीच्या आर्यवैश्य मंडळींनी आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सेवा दिल्याने गिरीश गुंडेवार ह्यांनी सर्वांचे  ऋण व्यक्त केले.ह्या प्रसंगी आर्यवैश्य महासभेचे राज्य कार्याध्यक्ष भानुदास वट्टमवार, महासचिव गोविंदराव बिडवई, माजी अध्यक्ष एकनाथराव मामडे, संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार,प्रसिध्दी प्रमुख सर्वश्री डॉ.विजय निलावार,किरण मुक्कावार, प्रा.अनिल मुगटकर,महेश गोविंदवार,बिपिन गादेवार,दीपक आसेगावकर,ऍड पापिंनवार,अभय गडंम,प्रभाकर पत्तेवार,संजय नळदकर, पुसद उमरखेड,हदगाव वसमत, बाळापूर,परभणी, मार्गदर्शक आदीचां मोमेंटो देवून सत्कार करण्यात आला.विशेष म्हणजे पहिलाच मेळावा असला तरी महिला मंडळींनी उत्कृष्ट परिचय संचालन केलं.आर्य वैश्य महिलां मंडळा ने  श्री गणेश वंदना तर स्वागत गीत व अन्य  धार्मिक गितांच सादरीकरण सौ.गौरी गुंडेवार ह्यांनी केलं.मंचावर आणि थेट प्रेक्षक गॅलरी मधे जावून  सौ.सुरेखा गुज्जलवार ह्यांनी उत्कृष्ट संचालन करून परिचय करून दिले तर ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलांवार ह्यांनी सत्कार संचालन व  मांनपत्र वाचन केलं.सर्व समिती सदस्यांनी केलेल्या  मेहनतीचं हे फळ असून दरवर्षी असाच नंबर वन ठरणार मेळावा आयोजित करावा अशी मागणी सभागृहातून आली.                   

✍️मंडळाचे बहुमोल योगदान :-         

श्री बालाजी मीत्र मंडळाचे वैशिष्टय म्हणजे ह्यात कुणीही पदाधिकारी सर्व समान हक्काचेच विश्वस्त  मंडळी आहेत.मेळाव्याच्या यशस्वितेसाठी विश्वस्त सर्वश्री गिरीशदादा विजयकुमार गुंडेवार,राजकुमार शरदराव गुंडेवार, ॲड. स्वप्नील विलासराव गुंडेवार, राम उत्तमराव गुंडेवार, ज्ञानेश्वर मामडे,आनंद चंद्रशेखर निलावार,ऍड.अशोक डूब्बेवार,नितीन निलावार,प्रशांत गुंडेवार,राहुल निलावार,गिरीश बासटवार ,किशोर गुंडेवार,डॉ.गोपाळ महाजन,डॉ विक्रांत व्यवहारे,विकास काप्रतवार,अभय चक्रवार,ऋषिकेश गुंडेवार,दीपक बासटवार, नरेश  बासटवार, संतोष बिडवई,ह्यांच्या सह प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशस्वी भूमिका बजावलेले पत्रकार डॉ.विजय निलावार,स्मरणिका बॅनर्स छपाई विभाग प्रमुख संतोष प्रतापवार सर्व दांनदाते  निःशुल्क सेवादाते आदींचे सर्वत्र कौतुक होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या