🌟प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती.....!

 


🌟नाशिक महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा गैरवर्तन व मारहाण प्रकरण🌟

मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला. २०१७ मध्ये नाशिक महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी गैरवर्तन तसेच त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी स्थगिती दिली. नाशिक महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी गैरवर्तन तसेच त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आमदार बच्चू कडू हे २०१९-२२ दरम्यान मंत्री होते. ८ मार्च २०२३ रोजी नाशिक सत्र न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ (सरकारी सेवकावर हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर) आणि ५०४ (जाणीवपूर्वक अपमान) अंतर्गत वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. त्यांना जामीन मंजूर करत अपिल दाखल करण्यासाठी शिक्षा स्थगित केली होती. सत्र न्यायालयाच्या शिक्षेविरोधात कडू यांनी अपील दाखल केले.

* प्रकरण नेमके काय आहे ?

दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव निधीचा वापर न केल्याच्या मुद्द्यावरून २४ जुलै २०१७ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलन केले होते. यावेळी कडू व इतर आंदोलक पालिका आयुक्तांच्या कार्यालयात गेले व तेथे त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी इतरांसह कडू यांच्यावर नाशिकमधील सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या