🌟विदर्भाने रणजी ट्रॉफी स्पर्धेत शानदार कामगिरी करत जेतेपद पटकावले....!

 


🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल विदर्भ संघाचे विधानपरिषदेत केले अभिनंदन🌟

मुंबई :- विदर्भाने यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत शानदार कामगिरी करत जेतेपद पटकावले आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ संघाचे विधानपरिषदेत अभिनंदन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, क्रिकेट विश्वचषक जिंकणारा आपला संघ असो, किंवा देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू असोत त्यांचा उचित सन्मान करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.


खेळाडूंना योग्य सन्मान व पुरस्कार देण्याचे काम राज्य शासन करेल. राज्य शासनाकडून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेली उत्कृष्ट कामगिरी त्याचप्रमाणे खो-खो विश्वचषक स्पर्धा आणि तेहरानमधील कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने मिळवलेले अजिंक्यपद यासाठी उपमुख्यमंत्री तथा सभागृह नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अभिनंदन पर प्रस्ताव बुधवारी मांडला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या