🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात विरोधकांना प्रत्युत्तर🌟
मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात विरोधकांना ठणकावले दरम्यान भुतपुर्व प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या उल्लेखाचा देखील विरोधक निषेध करणार का ? असा प्रश्न देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषदेत २८९ द्वारे स्थगन प्रस्ताव मांडला. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर कारवाई झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर व अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या अटकेची मागणी लावून धरत सभागृहाचे कामकाज रोखून धरले. दरम्यान, आझमी यांना सरकारने उचलून जेलमध्ये का टाकले नाही, असा संतप्त सवाल करत कोरटकर व सोलापूरकर यांच्याविषयीही भूमिका मांडावी, अशी जोरदार मागणी केली. शिवाय, सोलापूरकर यांच्यावर कारवाई होण्याऐवजी पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेण्यात आले. तर कोरटकर यांच्या संदर्भात नागपूरच्या पोलीस आयुक्तांशी आणि कोल्हापूरच्या पोलीस अधिक्षकांशी चर्चा केली. यावेळी कोरटकर यांचा मोबाईल जप्त होतो आणि कोरटकर सापडत नाहीत. हा कुठला प्रकार आहे, असा संतप्त सवाल केला. तर आझमींचा निषेध केला असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे सभागृहाने मिळून ठरवले. मग छत्रपतींचा ज्यांनी अवमान केला ते कोरटकर आणि सोलापूरकर अजून मोकाट कसे? अबू आझमींना वेगळा नियम आणि या दोघांना वेगळा न्याय कसा, असा सवाल काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केला.
💫आ.जितेद्र आव्हाड,पंडित नेहरू यांचा निषेध करा :-
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शंभर टक्के जेलमध्ये टाकू. पण तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती, तर कोरटकर यांनी कोल्हापूरच्या न्यायालयातून स्वतःला अरेस्ट न होण्यासाठी स्थगिती घेतली आहे. पण कोरटकर यांच्यासारखे चिल्लर लोक आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. औरंगजेब किती बलाढ्य होता आणि महाराज पाच फुटांचे होते, असे रेकॉर्डवर बोलले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकातील उल्लेखाबाबत निषेध केला नाही, असे सांगत फडणवीस यांनी विरोधकांची कोंडी केली.....
0 टिप्पण्या