🌟पुर्णा तालुक्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा जेष्ठ पत्रकार हरिभाऊ पाटील यांना पितृशोक....!


🌟तालुक्यातील धनगर टाकळी येथील जेष्ठ नागरिक देवराव पाटील यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९२ व्या वर्षी निधन🌟

पुर्णा (दि.०५ मार्च २०२५) - पुर्णा येथील विद्या प्रसारणी सभेच्या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा जेष्ठ पत्रकार हरिभाऊ पाटील यांचे वडील तथा तालुक्यातील धनगर टाकळी येथील ज्येष्ठ नागरिक देवराव लक्ष्मणराव पाटील यांचे आज बुधवार दि.०५ मार्च २०२५ रोजी पहाटे ०३.०० वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे ९२ वर्ष  होते तालुक्यातील धनगर टाकळी येथील जुन्या पिढीतील अत्यंत मनमिळाऊ व प्रेमळ स्वाभावाचे आदर्श व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या निधनामुळे धनगर टाकळीसह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज बुधवार दि.०५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०४.०० वाजता धनगर टाकळी येथील मूळ गावी अंत्यसंस्कार  करण्यात येणार आहे.सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगवान पाटील,श्री.अनिल पाटील व सेवा निवृत्त मुख्याध्यापक तथा जेष्ठ पत्रकार डॉ.हरिभाऊ पाटील यांचे ते वडील होत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या