🌟नंदिग्राम गृहनिर्माण संस्थेच्या ( गुरु नानक नगर ) अध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे युवा नेते दासराव पुयड.....!


🏠नंदीग्राम गृहनिर्माण संस्था ही जिल्ह्यातील एक मोठी व जुनी संस्था आहे🏠

नांदेड (दि.०३ मार्च २०२५) - मराठवाड्यातील सर्वात मोठी ग्रहणिमान संस्था असा लौकिक असलेल्या नांदेड येथील नंदिग्राम ग्रहणिमाण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी अजितपवार पक्षाचे युवा नेते दासराव पुयड पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.


यावेळी संस्थेची संचालक प्राचार्य भीमराव पाटील, राजीव खंदारे, कौसर आसम्मा, पाषामिया  कारदार, रामराव राठोड भाटेगावकर,संजय पटफळे, तेजवन सिघ पुंड, आनंदराव शिंदे,यासीन बेगम वाशीद, शेख रज्जाक, डायनिल दासरि, प्रसाद रुद्रावर आदी संचालक उपस्थित होते.

 नंदीग्राम गृहनिर्माण संस्था ही जिल्ह्यातील एक मोठी व जुनी संस्था आहे. या संस्थे 590 मतदार सभासद आहे. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यात दासराव पुयड यांच्या पेनलचे 17 पैकी 13 उमेदवार बहुमताने निवडून आले होते. त्यानंतरच्या वेगवेगळ्या घडामोडीनंतर दास राव पुयङ पाटील यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका उप निबंधक चे  अधिकारी एस.आर येवते यांनी काम पाहिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या