🌟भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे मराठवाडा विभाग प्रमुख स.गुरुदीपसिंघ संधू यांची मागणी🌟
नांदेड (दि.०७ मार्च २०२५) - नांदेड शहरातील नामांकित असलेली अल्पसंख्याक शाळा दर्जा असलेल्या ज्ञानमाता विद्याविहार शाळेमध्ये एका अल्पवयीन बालकावर शाळेतील कर्मचाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे शाळेतील अनागोंदी उघड होत आहेत त्यामुळे ज्ञानमाता शाळेच्या हिटलरशाही व जातीवादी प्रकारांची चौकशी करून सदर शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे मराठवाडा विभाग प्रमुख गुरदिपसिघ संधू यांनी नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मदर टेरेसा मिशन संस्थेअंतर्गत नांदेड शहरांमध्ये कामठा खुर्द परिसरात ज्ञानमाता विद्याविहार इंग्रजी माध्यमाची शाळा मागील तीस वर्षापासून सुरू आहे. सदर शाळा अल्पसंख्याक दर्जा असून या शाळेमध्ये इतर समाजातील विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने भरमसाठ फिस घेऊन शिक्षण घेतात. ज्ञानमाता विद्या विहार शाळेमध्ये दिनांक 06 मार्च 2025 रोजी शाळेतील एका 10 वर्षीय बालकावर शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
.ज्ञानमाता विद्याविहार शाळेमध्ये जातिवाद व धर्मद्वेशी शिक्षण राबविण्यात येत असल्याच्या तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक पिळवणूक केलेल्या शेकडो तक्रारी शिक्षणाधिकारी यांचेकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे या शाळेच्या कारभाराची चौकशी करून सीबीएससी नियमाप्रमाणे शाळा चालू आहे का ? त्याप्रमाणे फी आकारली जाते का ? डोनेशनच्या नावाने आर्थिक पिळवणूक होते का ? शासनाचे नियमाप्रमाणे ऑडिट झाले का ? शाळेतील सीबीएससीच्या दहावी वर्गात प्रवेशाच्या नावाने नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक नाकारले जाते असा आरोप निवेदनकर्ते गुरदिपसिंघ संधू यांनी केला आहे. त्यामुळे या बाबीची चौकशी करून संबंधित शाळेची मान्यता रद्द करून संस्था चालकांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.....
0 टिप्पण्या