🌟राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत🌟
मुंबई : राज्यात सर्वत्र दूधासह दुधापासून होणाऱ्या पदार्थांसह अन्य तत्सम अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करून जनसामान्यांच्या जिविताशी खेळण्याचे प्रकार होत असून ही अतिशय गंभीर बाब आहे त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही दूध आणि तत्सम अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
ॲनालॉग चीज हा पदार्थ राज्यात अनेक ठिकाणी ॲनालॉग पनीर या नावाने विक्री होत असल्याबाबत तसेच पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे उघडकीस आलेल्या दूध भेसळीसंदर्भात लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील समिती कक्षात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विक्रम पाचपुते, आमदार अभिजीत पाटील, आमदार कैलास पाटील यांच्यासह अन्न व औषध प्रशासन, वैद्यकीय शिक्षण, गृह तसेच वित्त व नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
0 टिप्पण्या