🌟कैलास भालेकर यांची स्व.तात्यासाहेब महाजन महाविद्यालयाच्या औद्योगिक क्षेत्रातील विकास समितीच्या तज्ञ सदस्य पदी निवड....!

                                               


      🌟त्यांच्या या नियुक्तीबाबत त्यांच्या मित्रमंडळी व हितचिंतकाकडुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे🌟       

 ✍️ मोहन चौकेकर 

चिखली :  चिखली शहर व बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर शिक्षण क्षेत्रातील संपूर्ण विदर्भातील नावाजलेल्या शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्व. तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विकास समितीच्या औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यपदी चिखली शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक  बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महालक्ष्मी किराणा माॅलचे संचालक युवा उद्योजक कैलास भालेकर यांची पुढील पाच  वर्षांसाठी महाविद्यालय विकास समितीच्या औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यपदी निवड झाली आहे ही अत्यंत गौरवाची आणि प्रेरणादायी बाब आहे.कैलास भालेकर यांच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रदिर्घ  अनुभवाचा व तांत्रिक कौशल्याचा  महाविद्यालयाच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी निश्चितच मोठा फायदा होणार आहे.

कैलास भालेकर यांनी यावेळी बोलताना आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की मी माझ्या अनुभवातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करण्याचा व उद्योग क्षेत्राशी थेट जोडणी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी जास्तीत जास्त उपलब्ध कश्या होतील या साठी मोठ्या प्रमाणावर निश्चितच प्रयत्न करणार आहे असे सांगितले.कैलास भालेकर यांची शिप्रम स्व . तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विकास समितीच्या औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे सचिव प्रेमराज भाला व संचालक मंडळाने त्यांचे  अभिनंदन केले आहे. त्यांच्या या नियुक्तीबाबत त्यांच्या मित्रमंडळी व हितचिंतकाकडुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.....                        

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या