🌟राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांची डॉ.विजय सतबीरसिंघ यांनी घेतली भेट...!


🌟नांदेड येथील तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या विकासा संदर्भात गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजय सतबीरसिंघ यांनी केली चर्चा🌟 

श्री हजूर साहेब नांदेड :- श्री हजूर साहेब नांदेड येथील पवित्र तिर्थक्षेत्र तख्त श्री हजूर साहेब सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक तथा पूर्व आयएएस अधिकारी डॉ.विजय सतबीरसिंघ यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री अतुल सावे यांची सदिच्छा भेट घेऊन श्री हजूर साहेब नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या विकासाबद्दल चर्चा केली यावेळी त्यांच्या सोबत नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राहुल करडीले हे देखील उपस्थित होते. 

यावेळी प्रशासक विजय सतबीरसिंघ यांनी गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या अंतर्गत सुरु असलेल्या विकास कामांबद्दल आणि शैक्षणिक संस्थांबद्दल माहिती दिली. ज्यामध्ये प्रशासक साहेबांच्या प्रयत्नांनी सुरु झालेल्या नांदेड विमान सेवा हि सध्या देशातील एकूण ०९ शहराशी जुडलेली असून, या सेवेस मुंबई व देशातील इतर मोठ्या शहरांशी जोडण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच गुरुद्वारा बोर्डातर्फे अनेक शैक्षणिक संस्था चालविल्या जात आहेत. ज्यामध्ये सिबीएसई स्कूल,आयटीआय,आधुनिक लायब्ररी ज्यामध्ये इंटरनेट सुविधेसोबत अनेक स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या पुस्तकांसहित प्रशिक्षण हि दिला जातो. गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने श्री दशमेश रुग्णालय चालीविला जात आहे, ज्यामध्ये सध्या हृदयरोग तज्ञ, दंत तज्ञ, मधुमेह, रक्तदाब, डायलेसिस आदि सारख्या मोठ्या व महाग उपचार अति अल्प दरात सेवेच्या रुपात दिला जात आहे. गुरुद्वारा दर्शनासाठी देशा-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी अति अल्प दरात निवासस्थान उपलब्ध असून भाविकांच्या वाढत्या संख्येला लक्षात घेऊन शेर-ए-पंजाब महाराजा रणजीत सिंघ जी यांच्या नावाने एक नवीन व आधुनिक निवासस्थानाच्या भव्य इमारतीचा काम प्रगतीपथावर आहे. प्रशासक साहेबांतर्फे यावेळी गुरुद्वारा कर्मचार्यांच्या हितासाठी कल्याणकारी योजनांबाबतदेखील चर्चा करण्यात आली. सिकलीगर समाजाबाबत हि यावेळी चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये सिकलीगर समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणावर विशेष भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुद्वारा साहिबतर्फे सुरु असलेल्या सामुहिक विवाह महोस्तवा सारख्या अनेक जनकल्याण व समाजकल्याण कार्याबद्दल हि चर्चा करण्यात आली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या