🌟पोलिसांकडून दुसऱ्यांदा पाठवण्यात आलेल्या समन्सला उत्तर देत त्याने सात दिवसांचा कालावधी मागितला🌟
चेन्नई : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन विडंबनात्मक गाने करणाऱ्या स्टैंड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात मुंबई पोलीसांकडे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याने कुणाल कामरा ह्याने. या प्रकरणी अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करणाऱ्या एका विडंबनात्मक गाण्याबद्दल कामरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून ही शून्य एफआयआर नोंदविण्यात आली होती. पण नंतर ही एफआयआर मुंबईतील खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम ३५३ (१) (b), ३५३(२) (सार्वजनिक उपद्रव) आणि ३५६(२) (बदनामी) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कामरा याने न्यायालयात युक्तिवाद केला की, तो तामिळनाडूतील विलुप्पुरम येथील कायमचा रहिवासी आहे, म्हणून त्याने ट्रान्झिट (प्रवासी) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. मुंबई पोलिसांकडून कुणाल कामरा याला दोन समन्स पाठवण्यात आले आहेत. पहिल्या समन्सला कुणालने कोणतेही उत्तर दिले नाही. मात्र, पोलिसांकडून दुसऱ्यांदा पाठवण्यात आलेल्या समन्सला उत्तर देत त्याने सात दिवसांचा कालावधी मागितला आहे....
0 टिप्पण्या