🌟आरमोरी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने 'राजे परतूनी यावे' या विषयावर काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या🌟
पुर्णा :- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १९-०२-२०२५ रोजी रचना प्रकाशन साहित्य समुह आरमोरी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने 'राजे परतूनी यावे' या विषयावर काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेचा निकाल दि.१४-०३-२०२५ रोजी जाहीर करण्यात आला त्यामध्ये पुर्णा जिल्हा परभणी येथील प्रतिभावंत कवी बौध्दाचार्य तथा भारतीय बौध्द महासभेचे शहर अध्यक्ष मा.उमाजी महादु बाऱ्हाटे उर्फ उमेश बाऱ्हाटे यांना प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.
या स्पर्धेचे परिक्षण समुह संस्थापिका, समिक्षिका, लेखिका, नाट्य कलावंत, उत्कृष्ट ग्राफिक्सकार, उत्कृष्ट सुत्रसंचलन करणाऱ्या, अंनिसच्या कार्यकर्त्या,सुप्रसिद्ध कवयित्री मा.सुनिता तागवान यांनी केले.सर्व विजेत्या व सहभागी कवी कवयित्रींना रचना प्रकाशन साहित्य समुह च्या वतीने ऑनलाईन आकर्षक सन्मानपत्र देण्यात आली आहेत.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील मुंबई,पुणे,ठाणे,अंधेरी,नागपूर,सेवाग्राम,गडचिरोली,नांदेड,बार्शी, नाशिक,कांदिवली,दारव्हा,धुळे,औरंगाबाद,चाळीसगाव व ईतर जिल्ह्यातील साहित्यिकांनी सहभाग नोंदविला होता या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून कवी उमेश बाऱ्हाटे यांचे अभिनंदन होत आहे.....
0 टिप्पण्या