🌟महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) राज्यात बांधणार १९ हजार घरे : मुंबईत ५१९९ घर बांधकामाचे उद्दिष्ट...!


🌟महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची १५९५१.२३ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी🌟

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सन २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात 'म्हाडा'च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण १९ हजार ४९७ घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ९२०२.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर मुंबई मंडळांतर्गत येत्या आर्थिक वर्षात ५१९९ घरांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. म्हाडाचा २०२४-२५ चा सुधारित तसेच सन २०२५-२०२६ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला प्राधिकरणाच्या २०२५-२०२६ च्या १५९५१.२३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला आणि २०२४-२५ च्या १०९०१.०७ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळांतर्गत येत्या आर्थिक वर्षात ५१९९ घरांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ५७४९.४९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोकण मंडळांतर्गत ९९०२ घरांची उभारणी करण्याचे उद्दिष्ट असून २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात त्यासाठी १४०८.८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे मंडळांतर्गत १८३६ घरांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ५८५.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागपूर मंडळांतर्गत ६९२ घरांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात १००९.३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर मंडळांतर्गत १६०८ घरांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी २३१.१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मुंबई मंडळातर्फे अर्थसंकल्पात वरळी, नायगांव, परळ बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेसाठी २८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी कॉलनी पुनर्विकास प्रकल्पासाठी ३५० कोटी रुपये, वांद्रे पश्चिम येथील परिध खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी २०५ कोटी रुपये, गोरेगाव सिद्धार्थनगर येथे सदनिका उभारणीसाठी ५७३ कोटी रुपये, परळ येथील जिजामाता नगर येथील भूखंडावर मुले व मुलींसाठी वसतिगृह उभारणीसाठी २० कोटी रुपये, गिरणी कामगारांच्या घरांसाठी ५७.५० कोटी रुपये, बोरिवली सर्व्हे क्र. १६० वरील योजनेसाठी २०० कोटी रुपये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील पुनर्वसन प्रकल्पासाठी २०० कोटी रुपये, पहाडी गोरेगाव प्रकल्पासाठी १७७.७९ कोटी रुपये, मालवणी झोपडपट्टी सुधार प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये, मागाठणे बोरिवली योजनेसाठी ८५ कोटी रुपये, एक्सर बोरिवली तटरक्षक दल योजनेसाठी ३० कोटी रुपये, गोरेगाव सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पासाठी २० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. नागपूर मंडळांतर्गत चंद्रपूर विशेष नियोजन प्राधिकरण योजनेसाठी ३७१.२० कोटी रुपये, टेक्सटाइल पार्क एम्प्रेस मिल योजनेसाठी ३५० कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

कोकणात वर्षभरात ९९०२ घरे बांधणार मुंबई मंडळापाठोपाठ सर्वाधिक आर्थिक तरतूद कोकण मंडळातील प्रकल्पांसाठी करण्यात आली आहे. कोकण मंडळामार्फत चालू वर्षात ९९०२ घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी अर्थसंकल्पात १४०८.८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या