🌟राज्यात राष्ट्रवादी साजरा करणार 'महाराष्ट्र महोत्सव' : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम....!


🌟माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे🌟


मुंबई :
संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला यंदा ६५ वर्षे पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात 'महाराष्ट्र महोत्सव' साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाच्या विविध फ्रंटल व सेल राज्य प्रमुखांची बैठक प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी घेतली व पक्षाच्या प्रदेश फ्रंटल व सेलच्या राज्य प्रमुखांना महाराष्ट्र महोत्सवाचा कार्यक्रम दिला. महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाची ओळख नव्या पिढीला करून देणारे कार्यक्रम या महाराष्ट्र महोत्सवात आयोजित करावेत अशा सूचनाही सुनील तटकरे यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांना दिल्या.

'महाराष्ट्र महोत्सवा' निमित्त राजधानी मुंबईत १ ते ३ मे दरम्यान सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील पंधरा दिवसांत नागपूर, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, अमरावती या प्रशासकीय विभागात स्थानिक मराठी संस्कृतीचा ऐतिहासिक ठेवा आणि ओळख अधोरेखित करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

'महाराष्ट्र महोत्सव' राज्यभरात पक्षाचा कार्यक्रम म्हणून साजरा करताना महाराष्ट्राची ओळख व संस्कृती अधोरेखित करणाऱ्या संकल्पना सुचवण्याची विनंती तटकरे यांनी या बैठकीत केली. मुंबईसह राज्यभरातील सर्व सहा विभागात संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा १ मे दिन 'महाराष्ट्र महोत्सव' भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्याच्या सूचना तटकरे यांनी केल्या. २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत असल्याचेही सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या