🌟मंगरुळपीर येथे आनंद मेळावा आणी विक्री व खाद्य प्रदर्शनी थाटात : आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते प्रदर्शनीचे ऊद्घाटन....!


🌟यशस्वी महिला बहुऊद्देशीय संस्थेकडून आनंद मेळाव्याचे आयोजन🌟


वाशिम
:- मंगरुळपीर येथील संत बिरबलनाथ महाराज संस्थान परिसरात यशस्वी महिला बहुऊद्देशीय महिला संस्था व्दारा आयोजीत भव्य आनंद मेळावा व विक्री व खाद्य प्रदर्शनी आयोजीत करण्यात आली होती.या कार्यक्रमाचे ऊद्घाटन आमदार श्याम खोडे आणी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.


             मंगरुळपीर येथील नयना पाटील,चंदाताई ठाकुर,मनिषा पांडे आणी निशा गावंडे या चौघा महिलांनी एकत्र येत यशस्वी महिला बहुऊद्देशिय संस्था स्थापन करुन आपल्या यशस्वीतेची सुरुवात केली. बाजारपेठेचा अभ्यास करत विविध प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीला सुरवात केली. प्रदर्शन तसेच थेट विक्रीवर भर देत गटाने आर्थिक उलाढाल वाढविली. गटाच्या माध्यमातून महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध झाला आहे.शहरी भागामध्ये विविध प्रक्रिया पदार्थांची मागणी वाढत आहे, ही बाब लक्षात घेत मंगरुळपीर येथील या चार महिलांनी एकत्र येत यशस्वी संस्थेची निर्मीती केला. या गटाने प्रक्रिया उद्योगाला सुरवात केली. आज या महिलांनी बनविलेल्या पदार्थांची मागणी वाढत असून, त्यांच्या मिळकतीतही चांगली भर पडली आहे.आपल्यासोबतच इतरही होतकरु व गरजु महिलांनी आर्थीक सक्षम होत आपल्या पायावर उभे राहण्यासाठी विविध ऊपक्रम राबवले.अशाच प्रकारे दि.२८ मार्च रोजी मंगरुळपीर येथील संत बिरबलनाथ महाराज संस्थान परिसरात भव्य आनंद मेळावा व विक्री व खाद्य प्रदर्शनी आयोजीत केली.आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते प्रदर्शनीचे ऊद्घाटन करण्यात आले.यावेळी बिरबलनाथ संस्थानच्या पुष्पाताई रघुवंशी,प्रांजली वसके,यशस्वी महिला संघटनेच्या अध्यक्षा नयना पाटील,सचिव चंदा ठाकुर,कोषाध्यक्षा मनिषा पांडे,सदस्या निशा गावंडे,राहूल तुपसांडे,कविता खरात,छाया पवार,कविता मालपानी,मंगेश धानोरकर,रामकुमार रघुवंशी,बंडु भगत,सुनिल मालपानी,प्रमोद घोडचर,मिलिंद पांडे,वनमाला ढगे,अनिता इरेकर,यांचेसह मान्यवरांची ऊपस्थीती होती.विविध स्टाॅल लावुन महिलांनी ऊत्फुर्त प्रतिसाद नोंदवला. महिलांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे ऊत्तम ऊदाहरण निर्माण केल्याने विविध स्तरातुन त्यांचे कौतुक केले.या कार्यक्रमाचे सुञसंचालन नंदीनी खरारे यांनी केले.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या