🌟नवी दिल्ली येथील पटेल नगर परिसरात महिला पत्रकारांसोबत पोलिसांचे असभ्य वर्तन....!


🌟एकास अटक,तीन जण निलंबित 'इरा' ने त्वरित दखल घेऊन केला तीव्र निषेध🌟

🌟महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मदन (बापू) कोल्हे यांची कडक कारवाईची  मागणी🌟


परभणी :
- नवी दिल्ली येथील पटेल नगर परिसरा मध्ये दि. 23 मार्च 2025 रोजी मुलाला मारत असतानाच्या घटनेचे 'हिंदुस्तान टाइम्स' च्या पत्रकार अनुश्री ह्या छायाचित्रे घेत असतांना पोलिसांनी त्यांचा कॅमेरा हिसकावून घेऊन दुसऱ्या एका पत्रकार महिलेला पोलिसांनी ढकलून तिच्या छातीला स्पर्श करून असभ्य वर्तन केले शिवाय फर्स्ट पोस्टचे पत्रकार प्रवीण सिंग यांच्या हाताला गंभीर इजा केली तसेच अनेक पत्रकारांना पोलिसांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून ,कायदा  पायदळी तुडवून असभ्य असे वर्तन केले आहे, याबाबत निषेध म्हणून सर्व छायाचित्र पत्रकारांनी आपले सर्व कॅमेरे पोलीस मुख्यालयासमोर जमा करुन,एकत्र ठेवून आपला रोष प्रकट केला आहे.

 या सर्व घटनेचा 'इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन'ने तीव्र निषेध व्यक्त केला असून ,दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, महिला पत्रकारांसोबत होणाऱ्या शारीरिक, गैरवर्तनाविरुद्ध तात्काळ कठोर पावले उचलून कडक शासन करण्यात यावे अशी मागणी  ' इरा 'चे राष्ट्रीय महासचिव मोहम्मद जहांगीर यांनी केली आहे.त्यांनी सर्व  पत्रकारांना संघटित करून, आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने ,पोलीस  प्रशासनाने या घटनेमधील एका पोलिसास तात्काळ अटक करून तिघा जणांना निलंबित केले आहे.

याशिवाय यामधील उर्वरित दोषींवर कडक कारवाई करून, पत्रकारांना संरक्षण व महिला पत्रकारांसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे...

💫महाराष्ट्र 'इरा' तर्फे तीव्र निषेध :-

पत्रकारासोबत गैरवर्तन व महिला पत्रकारांना दिलेल्या अमानुष, अशोभनीय वागणूकीचा ' इरा ' चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मदन(बापू) कोल्हे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून ,उर्वरित दोषी पोलिसांना निलंबित करून कडक शासन करण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या