🌟ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे यांचे प्रतिपादन🌟
पुर्णा (दि.20 मार्च 2025) :- पुर्णा शहरामध्ये सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळ व भारतीय बौद्ध महासभा आजी-माजी पदाधिकारी सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा या ठिकाणी अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महास्थवीर पूज्यभदंत पयावंश श्रामनेर संघ त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाड चवदार तळे क्रांती दिन बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संपन्न करण्यात आला यावेळी उपस्थित्यांना त्रिशरण पंचशील भदंत पयावंश यांनी दिले पूजा विधि बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे बौद्धाचार्य अमृत कऱ्हाळे अतुल गवळी यांनी पार पाडला यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत पॅंथर चळवळीतील अग्रणी भारतीय संविधान गौरव सोहळ्याचे मुख्य संयोजक प्रकाश कांबळे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून चवदार तळे सत्याग्रहाचे ऐतिहासिक पार्श्वभूमी विषद केली बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा लढा न्याय नैसर्गिक हक्का चा लढा होता.
या देशातील सार्वजनिक पानवट्यावर सर्व मानव जातीचा पशु पक्षाचा हक्क आहे परंतु हा न्याय नैसर्गिक हक्क डावलण्याचं काम प्रस्थापित मनुवादी समाज व्यवस्थेने केलं होतं गाव कुसा बाहेर बाहेर राहणारा प्रस्थापित समाज व्यवस्थेने अस्पृश्य ठरवलेल्या समाजाला सार्वजनिक पानवाठ्यावर पाणी पिण्याची बंदी होती त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह केला यामध्ये तत्कालीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर निस्सीम प्रेम करणारे हजारो लोक माता भगिनी सहभागी झाल्या होते हा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेशीर रित्या लढला आणि जिंकला कोणत्याही प्रकारचा हिंसक आंदोलन त्या ठिकाणी त्यांनी होऊ दिलं नाही या ऐतिहासिक घटनेला 98 वर्षे पूर्ण होत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आंदोलन केली सत्याग्रह केले व आपल्या न्याय मागण्या मान्य करून घेतल्या तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली आंदोलन ही संविधानिक पद्धतीने असली पाहिजे अशा प्रकारचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष पूर्णा शहराचे माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे कार्याध्यक्ष भीमशक्ती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे सचिव उद्योजक माजी आरोग्य सभापती एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष दादाराव पंडित प्रवीण कनकुटे पी डी सी बँकेचे कापुरे साहेब कामगार नेते कॉम्रेड अशोक कांबळे नगरसेवक वीरेश कसबे माजी नगरसेवक नटराज कांबळे महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे सेवानिवृत्त लोको पायलट विजय जोंधळे पत्रकार मोहन लोखंडे भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड माजी तालुकाध्यक्ष एम यु खंदारे बाबाराव वाघमारे माजी नगरसेविका गयाबाई खंदारे भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका उपाध्यक्ष ज्ञानोबा जोंधळे गौतम वाघमारे सर मुंजाजी गायकवाd डॉ.तूप समंदर डॉक्टर साहेब गोधने एडवोकेट हिरानंद गायकवाड सिद्धार्थ भालेराव गणेश सोनुले सामाजिक कार्यकर्ते साहेबराव सोनवणे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कैलास बलखंडे अनिल अहिरे, गायकवाड आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले.....
0 टिप्पण्या