🌟अशी माहिती रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागाने दिली🌟
नांदेड (दि.27 मार्च 2025) : लोकमान्य टिळक टर्मिनल मुंबई ते श्री हजूर साहिब नांदेड या गाडीच्या वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आला असून ही गाडी श्री हजूर साहिब नांदेड स्थानकावर रात्री 09.00 वाजता पोहोचण्या ऐवजी रात्री 08.15 वाजता पोहोचेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली.
मध्य रेल्वे ने उन्हाळी सुट्टी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून लोकमान्य टिळक टर्मिनल मुंबई ते हजूर साहिब नांदेड विशेष गाडीच्या 24 फेर्या पूर्ण करण्याचे ठरविले आहे. यापैकी काही गाड्यांच्या वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आला आहे. यापैकी गाडी संख्या 01105 लोकमान्य टिळक टर्मिनल मुंबई ते हजूर साहिब नांदेड विशेष गाडी - हि गाडी दिनांक 09 एप्रिल ते 25 जून, 2025 दरम्यान दर बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनल मुंबई येथून रात्री 00:55 वाजता सुटेल आणि ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड कुर्डूवाडी, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा मार्गे हजूर साहिब नांदेड येथे रात्री 08.15 वाजता पोहोचेल.
गाडी संख्या 01106 हजूर साहिब नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनल मुंबई विशेष गाडी - हि गाडी 09 एप्रिल ते 25 जून 2025 दरम्यान दर बुधवारी हजूर साहिब नांदेड येथून रात्री 10:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच लोकमान्य टिळक टर्मिनल मुंबई येथे गुरुवारी दुपारी 02:45 वाजता पोहोचेल. या गाडीत जनरल, स्लीपर आणि वातानुकुलीत मिळून 22 डब्बे असतील, अशी माहिती रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागाने दिली.....
0 टिप्पण्या