🌟आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत पालम उपनगराध्यक्षांसह अनेकांचा गुट्टे काका मित्र मंडळात जाहीर प्रवेश...!


🌟याप्रसंगी आ.रत्नाकर गुट्टे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या🌟


पालम :- पालम नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष इमदाद खान पठाण, नगरसेवक माऊली घोरपडे, सैफ चाऊस ल, जालिंदर हत्तीआंबिरे, संजय थिटे, रशीद खान पठाण, सय्यद विखार, झिया पठाण, जबार भाई यांच्या सह आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी गुट्टे काका मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी  सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच नेहमी लोकहिताची भूमिका घेऊन काम करा. जनतेची सेवा करताना प्रामाणिकपणा जपा. पारदर्शक आणि गतिमान कारभार करा, असेही आवाहन केले.


बनपिंपळा येथील निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर लांडगे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष इक्बाल चाऊस, युवक जिल्हाध्यक्ष बालासाहेब ढोले, प्रथम नगराध्यक्ष बालासाहेब रोकडे, नगरसेवक उबेद खान पठाण, अजीम खान पठाण, शेख गौस,असदखान पठाण,गफार खुरेशी, गणेश हत्तीआंबिरे, शेख अकबर यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष व मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या