🌟त्यांच्या पार्थिवावर आज रविवार दि.३० मार्च रोजी रामनगर पारशी गुट्टा येथील हिंदू स्मशानभुमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले🌟
हैदराबाद :- हैदराबाद येथील रामनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संजय विनोद टाक यांच्या सौभाग्यवती सौ.राखी संजय टाक यांचे वयाच्या ३५ व्या वर्षी अल्पशा आजाराने काल शनिवार दि.२९ मार्च २०२५ रोजी दुपारी ०३.५६ वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर आज रविवार दि.३० मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास रामनगर परिसरातील पारशी गुट्टा लगत असलेल्या हिंदू स्मशानभुमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आप्तस्वकीयांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या पश्चात पती एक मुलगा सासू सासरे दोन दिर दोन जावांसह दोन पुतने तीन पुतन्या असा मोठा परिवार असून त्या तेलंगणा पोलिस कर्मचारी सुनील विनोदकुमार टाक यांच्या वहिनी होत्या सौ.राखी टाक अत्यंत प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या होत्या त्यांच्या अकाली जाण्याने सर्वस्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
सौ.राखीताई टाक यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व संपूर्ण टाक परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर बळ देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना....
0 टिप्पण्या