🌟दैठणा पोलिसांची धाडसी कामगिरी : अल्पदरात सोने देण्याचे आमिष दाखवून फसवणारी टोळी केली गजाआड.....!


🌟दैठणा पोलिस ठाणे हद्दीतील एका ग्रामस्थाने आपली दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांना दिली होती🌟

परभणी : परभणी जिल्ह्यातील दैठणा पोलिसांनी कर्तव्यतत्परता दाखवत अल्पदरात सोने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतली.

            दैठणा पोलिस ठाणे हद्दीतील एका ग्रामस्थाने दैठणा पोलिसांशी संपर्क साधून आपली फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली दोन अनोळखी महिला व पाच पुरुषांनी आपणास संपर्क साधून कमीत कमी किमतीत सोने देतो म्हणून बाभुळगाव शिवारात बोलावून घेतले. त्या अनोळखी व्यक्तींनी लगेचच आपल्याकडील दहा लाख रुपयांची बॅग ताब्यात घेतली. पाच मिनीटात सोने आणून देतो म्हणून हे सारे तेथून निघून गेले, असे या ग्रामस्थाने सांगितल्या बरोबर सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक जायभाये यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकासही या बाबत कल्पना दिली. सदर बॅग चोरणारे महिला व इतर व्यक्तींचे वर्णन ऐकल्यानंतर सपोनि जायभाये यांनी यातील एक महिला उमरी येथील शिल्पा पवार नामक असल्याचा संशय आला. त्यांनी लगेचच त्या महिलेचा फोटो हस्तगत करुन तक्रारकर्त्यास दाखविला तेव्हा त्यातील एक महिला अशीच असल्याचे तक्रारकर्त्याने स्पष्ट केल्याबरोबर दैठणा व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सुरपिंपरी, वडगाव सुक्रे या शेतशिवारात पिकांमधून ऑपरेशन करीत संबंधित महिलेस ताब्यात घेतले. शिल्पाबाई पवार, अशोक पवार, केशव राठोड व अन्य एक अनोळखी महिला व तीन अनोळखी पुरुषांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या