🌟श्री हजूर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड व फूलंब्री टेक्सकॉम चा संयुक्त उपक्रम🌟
श्री हजुर साहेब नांदेड : मराठवाडयातील सुशिक्षीत व आयटीआय प्रशिक्षीत युवकांना रोजगार प्राप्ती ची संधी उपलब्ध करून देण्याच्या पवीत्र हेतू ने श्री हजूर साहिब आय.टी.आय व फूलंब्री टेक्सकॉम प्रा.लि.संभाजी नगरच्या संयुक्त विद्यमाने श्री हजूर साहिब आय.टी.आय,दशमेशनगर, देगलूर रोड,नांदडे येथे भव्य रोजगार भरती मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.
दिनांक ४/३/२०२५ मंगळवार रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजीत या भरती मेळाव्यात संभाजी नगर येथील औद्योगिक क्षेत्रातील नामवंत कंपन्या १. वार्निर इलेक्टॉनिक्स कंपनी प्रा.ली. २. रेयॉन इल्युमिनेशन अॅण्ड सोलार प्रा. ली, तसेच अहिल्या नगर (अहमदनगर) येथील मीडीया इंडिया प्रा. लि. सहभागी होत आहेत.
दहावी-बारावी उत्तीर्ण, पदवीधारक, आंय. टी. आय (कोणताही ट्रेड) उत्तीर्ण, पदवीका प्राप्त पूरुष उमेदवारांना रू १३५००/- ते २००००/- दर माह च्या आकर्षीत पगारावर नेमणूक दिल्या जाईल,
"हाताला काम नाही, खिशात दाम नाही अशा दूविधा मनःस्थितीत असणा-या सुशिक्षीत व प्रशिक्षीत बेरोजगार युवकांनी या सुंवर्ण सुधी चा लाभ घ्यावा. असे आव्हान संस्थेचे प्राचार्य स. गुरूबचनसिघ सिलेदार यांनी केले आहे
0 टिप्पण्या