🌟असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केला🌟
मुंबई :- परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबने विरोधात झालेल्या आंदोलनानंतर पोलिसी अत्याचारात बळी पडलेले भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला असा शवविच्छेदन रिपोर्ट आला असला तरी विसेराचा अहवाल यात तफावत असल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यामुळे मृत्यूचे खरे कारण विसेराच्या अहवालानंतर स्पष्ट होते. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि तो मिळवून देणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केला सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे त्यासाठी जे लागेल ते करू एका रूममध्ये नर्सिंग कॉलेज कोणी चालवत असेल तर चौकशी करून ते बंद करण्यात येतील. पण या कॉलेजेसची आवश्यकता आहे त्यात अनियमितता असतील तर बघू. नागपूर दंगलीत प्यारेखानचा त्या चादर घटनेशी काहीच संबंध नाही उलट त्याने हिंदू-मुस्लिम एकतेसाठी बैठका घेतल्या असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.....
0 टिप्पण्या