🌟नागपूरची हिंसक दंगल सुनियोजित पॅटर्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


🌟विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक ; दंगलखोरांना सोडणार नाही🌟

मुंबई :- नागपूर शहरासह परिसरात काल सोमवार दि.१७ मार्च २०२५ रात्री झालेली दंगल सुनियोजित पॅटर्न होता. पोलीसांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नागपूर दंगल प्रकरणी निवेदन करताना दिले.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व इतर हिंदूत्ववादी संघटनांच्यावतीने काल राज्यभरात औरंगजेबची कबर नष्ट करावी या मागणीसाठी आंदोलने करण्यात आली. नागपूरमध्ये काल दुपारी शिवाजी पुतळ्यासमोर औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीचे दहन करण्यात आले. यावेळी उर्दूत लिहिलेला एक कापडा जाळण्यात आल्यामुळे परस्पर विरोधी बाद निर्माण झाला होता. परंतु पोलीसांनी दोन्ही बाजुची समजूत काढत हा बाद मिटवला. याच दरम्यान औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळतांना धर्मग्रंथ जाळल्याची अफवा पसरली गेली होती.

याचे पडसाद रात्री आठ-साडेआठच्या सुमारास महाल परिसरात दोन गटात तुफान राडा झाला. सुरुवातीला फक्त घोषणाबाजी करण्यात आली मात्र, काहीच वेळात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. एका पोलीस उपअधीक्षकावर कुन्हाडीने हातावर बार करण्यात आले. या प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत एक निवेदन सादर केलं.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, सकाळी साडे अकरा वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकत्यांनी औरंजेबकी कबर हटाओ, अशा घोषणा देत आंदोलन केलं. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंढ्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. दुपारी ३.०९ वाजता हा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सायंकाळी अशी अफवा पसरवण्यात आली की जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कपडयावर धार्मिक मजबूर होता. त्यामुळे अत्तरोळीत संध्याकाळची नमाज आटोपून २००-२५० लोकांना जमाव तिथे जमला आणि घोषणाबाजी करू लागला याच लोकांनी आग लावून टाकू असं हिंसक बोलणं सुरु केल्याने पोलिसांनी तिथे बळाचा वापर केला.

हे सर्व होण्यापूर्वी या लोकांनी बजरंग दलाविरोधात तक्रार करायची असल्याचं पोलिसांना सांगितलं. तेव्हा पोलिसांनी त्यांना ठाण्यात नेलं त्यांची तक्रार दाखल करुन घेतली. एकीकडे पोलिसांची कारवाई सुरु असताना दुसरीकडे हंसापुरी भागात २००-३०० लोक हातात काठ्या घेऊन होते, त्यांनी दगडफेक केली, त्यांच्या चेहऱ्यावर कपडा बांधलेला होता. या घटनेत १२ दुचाकींचे नुकसान झाले आहे, तर काहींवर शस्त्रांनी वार करण्यात आले. या घटनेत ३३ पोलीस जखमी झाले आहेत. ज्यामध्ये तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस होते. त्यापैकी एका पोलिसावर कुन्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. ५ नागरिक जखमी झाले आहेत.

त्यापैकी एक गंभीर आहे. याप्रकरणी ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतिनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिल नगर या ठाण्यांच्या हद्दीत प्रवेश पॉइंटवर नाकाबंदी करण्यात आली आहे एसआरपीएफच्या ४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. सकाळी एक घटना घडली, त्यानंतर मध्यंतरीच्या काळात शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशाप्रकारचा हल्ला केल्याचं लक्षात येत आहे.

याचं कारण म्हणजे जवळपास एक ट्रॉली भरुन दगड मिळाले आहेत. शस्त्रही मोठ्या प्रमाणात दिसून आले. ते जप्त करण्यात आले आहेत. ठरवून काही ठराविक घरं आणि आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलं आहे. यामध्ये काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसत आहे. अशा लोकांवर कारवाई केलीच जाईल. कुठल्याही परिस्थितीत कुणालाही कायदा हाती घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काहीही झालं तरी सोडणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं. पोलिसांवरील हल्ला सहन केला जाणार नाही. राज्य शासनाने या दंगलीची गंभीर दखल घेतली असून राज्याच्या पोलीस महासंचालकांनी राज्यभरात सतर्कतेचा इशारा दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले......

💫राज्यात कायदा-सुव्यवस्था राखणे हे महत्वाचं आहे, त्यामुळे सर्वांनी संयम राखला पाहिजे💫

💫राज्यातील जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन💫


छावा चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्यासमोर आणला. त्यामुळे राज्यात लोकांच्या भावना प्रजन्तित झाल्या आहेत, औरंगजेब बद्दलचा राग समोर येत आहे.तरी, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखणे हे महत्वाचं आहे, त्यामुळे सर्वांनी संयम राखला पाहिजे. महाराष्ट्र एक प्रगतीशील राज्य आहे, इथली सामाजिक घडी नीट राहिली तरच आपल्याला प्रगतीकडे जाण्यास मदत होईल. जर, इथे कोणी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्याची जात-धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या