🌟भारतावर २ एप्रिलपासून आम्हीही आयात शुल्क लादणार : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची संसदेत घोषणा🌟
वॉशिंग्टन : भारत आमच्यावर १०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादतो हा योग्य निर्णय नाही. आम्हीही येत्या २ एप्रिलपासून भारतावर आयात शुल्क लादणार आहोत. यापुढे जो देश अमेरिकेवर आयात शुल्क लादेल, त्या देशावर आमेरिकाही तितकेच आयात शुल्क लादेल. येत्या २ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करताना जाहीर केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी संसदेच्या संयुक्त सत्राला प्रथमच संबोधित केले. ट्रम्प यांनी मेक्सिको, चीन, युक्रेन व भारत या देशांना आपल्या भाषणात इशारा दिला.
0 टिप्पण्या