🌟त्यांच्यातील कर्तृत्व/वक्तृत्व/नेतृत्व क्षमता पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावतील काय🌟
- वृत्त विशेष - चौधरी दिनेश 'रणजीत'
परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदार व धनदांडग्या उमेदवारांचा विधानसभा मतदार संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगाखेड विधानसभा मतदार संघात मागील २०१९ व नुकत्याच झालेल्या नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत गंगाखेड विधानसभा मतदार संघातून सतत दोन वेळा निवडून आलेले विद्यमान आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांना जोरदार लढत देऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले शिवसेना (उबाठा) गटाचे तरुण तडफदार उमेदवार तथा जिल्हाप्रमुख विशाल विजयकुमार कदम यांनी नुकताच शिवसेना उबाठा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करीत नांदेड येथे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे) गटात जाहीर प्रवेश केला.
परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यमान जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी शिवसेना (शिंदे) गटात जाहीर प्रवेश केल्याने शिवसेना (उबाठा) गटात खळबळ माजली होती गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राजकीय/आर्थिक दृष्ट्या सर्वार्थाने सधन असलेल्या विद्यमान आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्यासह गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र विधानसभेत तब्बल तीन वेळेस नेतृत्व केलेल्या माजी आमदार सिताराम चिमाजी घनदाट यांना सतत दोन विधानसभा निवडणुकीत 'जबरदस्त काटे की टक्कर' दिलेल्या विशाल कदम यांना शिवसेना राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २७ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत संधी देऊन त्यांना विधान परिषदेत गंगाखेड विधानसभा मतदार संघातील तमाम जनतेचे नेतृत्व करण्याची संधी देतील काय ? असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सन २०१९ व २०२४ या मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पुर्णा तालुक्याचे भुमिपुत्र असलेल्या विशाल विजयकुमार कदम यांनी प्रतिस्पर्धी तुल्यबळ उमेदवार म्हणून विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या समोर प्रखर आव्हान उभे करीत असल्याने व पुर्णा तालुक्यातून सातत्याने मतांची आघाडी घेत असल्यामुळे विद्यमान आमदार महोदयांकडून पुर्णा तालुक्याला सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याची भावना तालुक्यातील जनसामान्यांसह मतदार जनतेमध्ये देखील निर्माण झाली असल्यामुळे आपल्या हक्काचा देखील असा एक लोकप्रतिनिधी असायला हवा जो वेळोवेळी आपल्या हक्कासाठी विधानसभा/विधान परिषदेत प्रखरतेने आवाज उचलेल अशी भावना पुर्णा तालुक्यातील जनसामान्यांसह तमाम मतदार जनतेत निर्माण झाली आहे.
शिवसेना (उबाठा) गटाला कायमची सोडचिठ्ठी देऊन शिवसेना (शिंदे) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करुन त्यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेल्या विशाल विजयकुमार कदम यांच्यातील कर्तृत्व/वक्तृत्व/नेतृत्व क्षमता लक्षात घेऊन शिवसेना राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे त्यांची निश्चितच विधान परिषदेवर वर्णी लावून पुर्णा तालुक्याला एक हक्काचा लोकप्रतिनिधी देतील अशी अपेक्षा जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.....
0 टिप्पण्या