🌟परभणीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवन चरित्रावरील नाटकाचे सोमवार दि.२४ मार्च रोजी सादरीकरण...!


🌟अनुवाद कलाविष्कार सेवाभावी संस्था संभाजीनगर यांच्या वतीने होणार सादरीकरण🌟

परभणी :- परभणी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षा निमित्त सोमवार दि.२४ मार्च रोजी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात सायंकाळी ०६.०० वाजता नाटकाचे सादरीकरण होणार आहे.

अनुवाद कलाविष्कार सेवाभावी संस्था संभाजीनगर यांच्या वतीने सादरीकरण होणार आहे. या नाटिकेच्या माध्यमातून राजमाता अहिल्यादेवी यांचा इतिहासाचे वेगवेगळे पैलू आपल्याला पाहायला मिळणार आहेत . प्रभावती नारी मंच, अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र चे ऋषिकेश सकनूर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील आहिल्या प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी आवाहन सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केले आहे. प्रवेश विनामूल्य असणार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या