🌟महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द वारणाऱ्या कोरटकरला ३ दिवसांची पोलीस कोठडी...!

 


🌟न्यायालयाने प्रशांत कोरटकरला २८ मार्च पर्यंत सुनावली पोलीस कोठडी🌟

कोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरुन इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन फरार झालेल्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरला तेलंगणा राज्यातून काल सोमवार दि.२४ मार्च २०२५ रोजी अटक करण्यात आली होती आज मंगळवार दि.२५ मार्च रोजी त्याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने त्याला २८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नागपूरचा पत्रकार प्रशांत कोरटकर याने इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना एका महिन्यांपूर्वी मध्यरात्री फोन करुन अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. या प्रकरणी इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूर पोलीसांकडे रितसर तक्रार केली होती. तक्रार झाल्यानंतर सुरुवातीला कोरटकरने सावंत आणि आपली ओळखच नाही. मी त्यांना फोन केलाच नाही असा दावा केला होता. या दरम्यान राज्य सरकारने कोरटकर यांच्या संरक्षणासाठी त्याच्या नागपूर येथील घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस बंदोबस्तात असतांनाच कोरटकर नागपूरहून फरार झाला. दरम्यानच्या काळात त्याने कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून अटकपूर्व जामिन मिळवला. परंतु या अटकपूर्व जामिनाला पोलीस प्रशासनाने न्यायालयात आवाहन दिले होते. उच्च न्यायालयात देखील कोरटकरला दिलासा मिळाला नव्हता. तब्बल एक महिनाभर राज्याचे पोलीस कोरटकरचा शोध घेत होती. प्रशांत कोरटकरला काल सोमवारी तेलंगणामध्ये अटक केली गेली. त्यानंतर पोलिसांनी त्याला कोल्हापूरमध्ये आणल्यावर वैद्यकीय चाचणी करत कोर्टामध्ये हजर केलं.
यावेळी कोरटकरच्या वकीलांनी आरोपीला अटक करायची असेल त्याला नोटीस दिली पाहिजे. असा युक्तीवाद केला. तक्रारदाराच्यावतीने अॅड. असीम सरोदे यांनी कोरटकर हा आरोपपत्र दाखल झाल्यापासून मिस्टर इंडियासारखा गायब झाला असेल तर त्याला शोधायचं कुठं? परत पोलिसांवरच खापर फोडायचं का? असा युक्तीवाद करीत सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकुन घेतल्यानंतर प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या