🌟यान १९ मार्चला विल्यम्स व विल्मोर यांना घेऊन १९ मार्चला पृथ्वीवर परतणार🌟
वॉशिंग्टन : गेल्या ९ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या पृथ्वीवर येण्याच्या आशा रविवारी पल्लवित झाल्या आहेत. हे यान १९ मार्चला विल्यम्स व विल्मोर यांना परत आणणार आहे.
एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सचे स्पेसक्राफ्ट 'ड्रॅगन' २८ तासांच्या प्रवासानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर पोहचले. आपल्याला नेण्यासाठी आलेल्या अंतराळवीरांना पाहून सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. १६ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार, सकाळी ९.४० वाजता 'ड्रॅगन'ने आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर डॉकिंग केले. त्यानंतर सकाळी ११.०५ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राचे 'हॅच' खुले झाले. हे 'ड्रॅगन' यान विल्यम्स व विल्मोर यांना पृथ्वीवर आणणार आहे.
शनिवारी 'स्पेसएक्स'च्या फाल्कन ९ रॉकेटने चार सदस्यांसह अंतराळात उड्डाण केले. आता अंतराळवीर निक हेग, अलेक्सांद्र गोरबुनोव, सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे पृथ्वीवर परतनार आहेत.....
0 टिप्पण्या