🌟महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा रविवारी नांदेड जिल्हा दौरा.....!


🌟उद्या रविवारी सकाळी त्यांचे नांदेड येथील श्री.गुरु गोविंद सिंह जी विमानतळावर आगमन होणार🌟

नांदेड - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उद्या रविवार दि.२३ मार्च २०२५ रोजी विविध कार्यक्रमानिमित्त नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत उद्या रविवारी सकाळी त्यांचे नांदेड येथील श्री.गुरु गोविंद सिंह जी विमानतळावर आगमन होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी १०.१५ वाजता श्री. गुरुगोविंद सिंहजी विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर वाहनाने ते नरसी नायगावकडे प्रयाण करतील. ११ वाजता नरसी नायगाव येथे आगमन व येथील कार्यक्रमात ते सहभागी होतील. दुपारी २.४० पर्यंत नरसी नायगाव येथे त्यांची वेळ राखीव असून येथील कार्यक्रम संपल्यानंतर शिवराज पाटील होटाळकर यांच्याकडे ते भेट देणार आहेत. दुपारी ४.०० वाजता जिल्हयातील सांगवी येथे नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली येथील सर्व लोकप्रतिनिधी व पक्षीय पदाधिकाऱ्याच्या बैठकीत ते सहभागी होतील. सायंकाळी ६.३० वाजता नांदेड येथील हैदर गार्डन इफ्तार पार्टीमध्ये ते सहभागी होतील. त्यानंतर ७.५५ ला गुरुगोविंद सिंह जी विमानतळावरून मुंबईसाठी ते प्रयाण करतील.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या