🌟'डिजिटल अटक' नावाच्या नवीन सायबर गुन्ह्यातून ८६ वर्षीय महिलेची २० कोटींची फसवणूक....!


🌟 'सिबीआय अधिकारी' असल्याचे भासवून या वृद्ध महिलेला धमकावण्यात आले🌟

मुंबई : दक्षिण मुंबईतील ८६ वर्षीय महिलेची तब्बल २० कोटी रुपयांची फसवणूक 'डिजिटल अटक' नावाच्या नवीन सायबर गुन्ह्यातून करण्यात आली दोन महिन्यांच्या कालावधीत हा प्रकार घडला असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे असे पोलिसांनी काल गुरुवार दि.२० मार्च २०२५ रोजी सांगितले.

💫फसवणुकीची पद्धत :-

एका फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने 'सिबीआय अधिकारी' असल्याचे भासवून या वृद्ध महिलेला धमकावले. डिसेंबर २६, २०२४ ते मार्च ३, २०२५ या कालावधीत ही फसवणूक झाली. गुन्हेगारांनी महिलेवर घरातच राहण्यासाठी दबाव आणला आणि ती कुठे आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी दर तीन तासांनी कॉल करून तिची स्थिती तपासली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या