🌟पुर्णेतील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध जयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर....!


🌟अध्यक्ष पदावर मा.उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे तर कार्याध्यक्ष पदावर चक्रवर्ती वाघमारे उपाध्यक्ष पदावर राजकुमार सुर्यवंशी🌟 

पुर्णा (दि.११ मार्च २०२५) - पुर्णेतील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध जयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध  सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्ष पदावर माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते उत्तमभैया खंदारे तर कार्याध्यक्षपदी चक्रवर्ती वाघमारे तर उपाध्यक्षपदी राजकुमार सुर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध जयंती महोत्सव समितीची उर्वरित कार्यकारीणीत सचिव पदावर मानगरसेवक हर्षवर्धन गायकवाड सहसचिव पदावर चैत्यानंद वाघमारे तर कोषाध्यक्ष पदावर दादाराव पंडित,सहकोषाध्यक्ष पदावर प्रवीण कनकुटे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध जयंती महोत्सव समितीची कार्यकारिणीतील सन्माननीय पदाधिकारी यांचे महाराष्ट्र पोलीस मिलिंद भैय्या कांबळे व विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्या वतीने सत्कार जंगी सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.....

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या