🌟कुप्रसिद्ध गुंड सतीश भोसले उर्फ 'खोक्या' गजाआड ; विमानाने पळ काढण्याचा प्रयत्न.....!


🌟उत्तर प्रदेश पोलिस व बिड जिल्हा पोलिस दलाची संयुक्त कारवाई🌟

बिड : बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील शिरुर मधील शेतकरी पिता-पुत्रांना बेदम मारहाणीसह वन्य प्राण्यांची शिकार केल्या प्रकरणी पोलिसांना गुंगारा देत कुप्रसिद्ध गुंड सतीश भोसले उर्फ 'खोक्या' उत्तरप्रदेशातून विमानाने परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असतांना बीड पोलीस व उत्तरप्रदेश पोलीसांनी जेरबंद केले आहे. उद्या त्याला बीड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणा पाठोपाठ हरिणाची शिकार करण्यास विरोध करणाऱ्या शेतकरी पिता-पुत्रांना बेद्दम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मारहाण करणारा हा कुख्यात गुंड सतीश भोसले उर्फ खोक्या असल्याचे निष्पन्न झाले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या गुन्हेगारी संदर्भात सातत्याने गंभीर आरोप करणारे भाजपचे आ. सुरेश धस यांचा खोक्या हा लाडका कार्यकर्ता असल्याचे त्यांनी स्वतः कबुल केले. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खोक्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून खोक्या फरार झाला होता. बीड पोलीस त्याच्या शोधात होते. याच पोलीस यांच्या माध्यमातून त्याला अटक करण्यात आली. प्रयागराजहून सतीश भोसलेला बीडकडे आणले जात आहे. मागील आठवड्यात एका व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा शिरुरमधील धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर सतीश भोसलेसह ४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासूनच पोलीस या खोक्या भाईच्या मागावर होते. याच दरम्यान खोक्याचे अनेक व्हिडीओ सध्या समोर आले. दुसऱ्या व्हिडीओत खोक्या हा हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसला. एखाद्या हिरोला देखील लाजवेल अशा थाटात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वावरतांना दिसला. सोबतच एका व्हिडीओत सतीश भोसले कारमध्ये पैसे फेकताना दिसला. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या