🌟श्री चैतन्य महाप्रभूचा अविर्भाव दिवस व गौरपौर्णीमा महोत्सवात आयोजित प्रवचनातून ते म्हणाले🌟
हिंगोली (दि.१७ मार्च २०२५) - श्री चैतन्य महाप्रभूजी ची शिकवण ही विश्वकल्याणार्थ व निसर्ग कल्याणार्थ असून हे सर्वांनी जाणून अंगिकरल्यास सर्वे भवंतू सुखिन: साकारल्या जाईल त्यासाठीच इस्कॉन जगभर सेवारत आहे असे प्रतिपादन इस्कॉन चौपाटी चे प्रवक्ते श्री रुद्र्नाथ प्रभूजी ह्यांनी काढले.हिंगोली येथे इस्कॉन हिंगोली शाखेच्या वतीने महागौरांग प्रभूजी चे हॉल मध्ये श्री चैतन्य महाप्रभूचा अविर्भाव दिवस व गौरपौर्णीमा महोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी श्रीमान रूद्रनाथप्रभूजी यांनी प्रवचनातून म्हटले.
कलियुग ही भौतिकतेच्या अंध:काराची अशी युगकालीन अवस्था आहे जेथे धार्मिकता,सत्य, सहनशीलता,दया आणि आध्यात्मिकता हळूहळू नष्ट होत चालली आहे.अशा या अंधकारमय कलीयुगात भगवान श्री कृष्ण स्वतः चैतन्य महाप्रभूच्या रूपात अवतरले आणि त्यांनी या कलीयुगातील सर्व जीवांचा उध्दार करण्यासाठी हरिनाम संकीर्तन रूपात अत्यंत सोपा प्रभावशाली मार्ग दिला.भगवान श्री कृष्ण पंधराव्या शतकात पश्चिम बंगाल मधील कृष्णानगर जिल्ह्यातील नवद्विप या ठिकाणी श्री चैतन्य महाप्रभूच्या रूपात प्रकट झाले. या मागील रहस्य चैतन्य चरीतामृत ग्रंथात व महाभारतातील विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रा मध्ये स्पष्ट केले आहे.चैतन्य महाप्रभूच्या अवतीर्ण होण्याची बाह्य कारणे व अंतरंग कारणे श्रील कृष्णदास कवीराज यांनी दिली आहेत.ह्यात पहिले
अंतरंग कारण म्हणजेच भगवान श्री कृष्णाना स्वतः च भक्तभावाचा अनुभव घ्यायचा होता दुसरे कारण म्हणजे बाह्य कारणे हरिनाम संकीर्तन द्वारे भक्तीचा प्रचार करण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू अवतीर्ण झाले.
हा भगवंताचे छन्न अवतार म्हणजे गुप्त अवतार आहे.
श्रीमद् भागवत चे अकराव्या स्कंधात चैतन्य महाप्रभूच्या अवतीर्ण होण्याची कारणे दिली आहेत
*कृष्ण वर्ण त्विषाकृष्णंसांगोपांगास्त्र पार्षदम l*
*यज्ञैसंकिर्तनप्रायैर्यजन्ती हि सुमेधा: ll* कलियुगात स्वतः श्रीकृष्ण प्रकट होतील पण त्यांचा रंग वितळलेल्या सुवर्णा प्रमाणे राहील ते आपल्या भक्तासोबत राहून संकिर्तन यज्ञाचा प्रचार करतील आणि बुध्दीमान लोक त्यांची भक्ती करतील आज संपूर्ण जगात ही भविष्यवाणी खरी होतांना दिसते असेही रुद्रनाथ प्रभू जी म्हणाले तेंव्हा "हरी बोल" च्या जयघोषाने परिसर दुमदुमला.कथेनंतर हरे कृष्णा, हरे राम ह्या महामंत्राचे संगीतमय संकीर्तन करून उपस्थितांनी डौलाने त्यात रंगत आनली. स्वतः रुद्रनाथ प्रभूजीनी इस्कॉन भक्त भाविकांसह फेरताल धरून नृत्याचा स्वानंद घेतला. उपस्थित भक्तभाविकात अनेक उच्च विद्याविभूषित गणमान्य मंडळी,विशेष निमंत्री ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार सह महिला,पुरुष, युवक,युवती, आणि ग्रामीण भागातील भक्तभाविक चार तास सहभागी झाले. शेवटी भक्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.रुद्रनाथ प्रभूजी च्या आदेशानुसार श्रीमान विठ्ठलचंद्रदास प्रभूजीं च्या हस्ते अभिषेक प्रारंभ झाला तदनंतर महा आरती करण्यात आली. इस्कॉन शाखेचे महागौरांग प्रभूजी, प्रा.सुनील गुंडेवार,पियूष अग्रवाल, गौरव देडे चार्टर्ड अकौटंट व सौ. सुरभी देडे, विलास शिनगारे, डॉ.नितेश चौधरी, डॉ गजानन शिंदे,अँड रणबावळे, पतंजली चे योग शिक्षक श्री उमेश तोषणीवाल,श्री व सौ काळे , उमा तांडूरकर माताजी, विजया माताजी, कोमल अग्रवाल माताजी,ब्रजराणी माताजी ,शंकर कोठे टे,सौ मिरा कोठे,सौ.गुंडेवार,सौ शितल बोरकर,सौ. सुषमा होकर्णे, श्रीराम मुळे गणेश मार्कड टाकळगव्हाणकर गुरुजी श्री व सौ.कर्हाळे आदी सर्व उपस्थितांनी देखील अभिषेक केला.हिंगोली शाखेच्या वतीने आयोजित विविध मुल्यशिक्षण स्पर्धा परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये एक हजाराहून अधिक विद्यार्थी भाग घेतला होता. या करीता सहकार्य करणाऱ्या विविध शाळेतील शिक्षकांना श्री रुद्रनाथ प्रभुजीं च्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आल. सर्वांच्या सहभागाने श्री विठ्ठलचंद्रदास यांनी महाआरती केली नंतर महाप्रसाद वितरण करण्यात आला.सुत्रसंचालन प्रा.सुनील गुंडेवार, पियूष अग्रवाल, ह्यांनी केलं.इस्कॉन हिंगोली शाखेने भव्यदिव्य आयोजन प्रतिवर्षा प्रमाणे ह्या वर्षी देखील यशस्वीरित्या संपन्न केल्याने भक्त भाविकांनी आयोजकांचे अभिनंदन करून भविष्यात हिंगोली येथे मंदिर निर्माण साठी दानशुरांकडून भूखंड मिळवून लोकसहभागातून कायम स्वरुपी केंद्र उभारण्यात यावे कारण मागील पंचवीस वर्षे पासून इस्कॉन हिंगोली कडून विविध सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक आदी उपक्रम राबविन्यात येतात .त्यासाठी प्रतिष्ठित दानशूर मंडळी नी आर्थिक पुढाकार घेऊन कायमस्वरूपी केंद्रासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा भक्त भाविकांनी व्यक्त केली.......
0 टिप्पण्या