🌟मद्यप्राशन करून वाहन चालविणे तळीरामांना पडले महागात🌟
परभणी (दि.१५ मार्च २०२५) : परभणी जिल्हा पोलिस प्रशासनाने जिल्हाभरात होळी/धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग व नाकाबंदी दरम्यान तपासणी करत एकूण १८६ प्रकरणामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविणार्या तळीरामांच्या विरोधात कठोर कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत.
मद्यप्राशन करून वाहन चालविल्यामूळे मोठमोठे अपघात होवून जिवितांचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. याची दखल घेत जिवित व मालवत्तेचे नुकसान टाळता यावे म्हणून पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी परभणी जिल्ह्यात मोठा बंदोबस्त नेमून संबंध जिल्हाभर पोलीस पेट्रोलिंग व ठिकठिकाणी नाकाबंदी लावून मद्यप्राशन करून वाहन चालविणे व इतर वाहतून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यांसंदर्भात आदेश व सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने शुक्रवार दि.१४ मार्च २०२५ पोलिसांनी पेट्रोलिंग व नाकाबंदी दरम्यान तपासणी करत जिल्ह्यात एकूण १८६ प्रकरणामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविणार्या चालकांविरोधात मो.वा.का. कलम १८५ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.......
0 टिप्पण्या