🌟त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटूंबियांसह मित्र परिवारासह परभणीकरांना मोठा धक्का बसला🌟
परभणी : तेलंगणा राज्यातील श्रीशैलम येथे दर्शनासाठी आपल्या खाजगी वाहनाने गेलेले मुंबईचे पोलिस उपायुक्त डॉ.सुधाकर पठारे व परभणी येथील नामांकित गुत्तेदार तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाहनाला शनिवार दि.२९ मार्च २०२५ रोजी श्रीशैलम जवळ बसने दिलेल्या जोरदार धडकेत भागवत खोडके पाटील वय ६६ वर्ष जागेवरच मृत्यू झाला तर पोलिस उपायुक्त डॉ.सुधाकर पठारे हे गंभीर जखमी झाले होते परंतु उपचारा दरम्यान त्यांचा देखील मृत्यू झाला.
या बाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई येथील पोलीस उपायुक्त डॉ.सुधाकर पठारे व त्यांचे सहकारी भागवत खोडके हे त्यांच्या वाहनाने देवदर्शनाकरीता निघाले होते तेलंगणातील श्रीशैलमजवळ एका बसने दिलेल्या जोरदार धडकेत खोडके हे जागीच मृत्यूमुखी पडले तर पोलिस उपायुक्त डॉ.पठारे हे गंभीर जखमी झाले. उपचार सुरु असतांना त्यांचेही निधन झाले. या अपघातात कार चालक बचावला. दरम्यान, खोडके पाटील हे हिंगोली जिल्ह्यातील शेवगाव खोडके येथील मूळ रहिवाशी होत ते परभणीत वास्तव्यास होते. येथील नामवंत शासकीय गुत्तेदार होते. तसेच पूर्णवादी परिवाराचे ते सदस्य होते. जीवनकला मंदिराचे ते अध्यक्ष होते अन्य सामाजिक व धार्मिक संस्थांशी ते संलग्न होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटूंबियांसह मित्र परिवार व परभणीकरांना मोठा धक्का बसला.....
0 टिप्पण्या