🌟राज्यातील सर्वसामान्य शिधापत्रिका धारकांच्या आनंदावर विरजण : आनंदाचा शिधा योजना शासनाने केली बंद ?


🌟राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजनांना लागली कात्री🌟

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य गोरगरीब शिधापत्रिका धारकांना सनासुदीला दिलासा देण्याच्या उद्देशाने सुरू केलेली व लोकप्रियतेचे शिखर गाठलेली आनंदाचा शिधा योजना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडाळली असल्याचे समोर आले आहे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने सदरील आनंदाचा शिधा योजना सुरु करण्यात आली होती या योजनेच्या माध्यमातून सणासुदीला राज्यातील १ कोटी ६३ लाख लोकांना लाभ मिळत होता. पण आता राज्याच्या खडखडाट तिजोरीत झाल्यानं आनंदाचा शिधा योजना गुंडाळण्यात आली आहे.

 आनंदाचा शिधा योजनेच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना सणासुदीच्या काळात एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणा डाळ, एक लीटर पामतेल दिलं जात होतं. गरिबांचा सण गोड करण्याच्या उद्देशानं शिंदे सरकारनं ही योजना सुरु करण्यात आली होती. पण आता फडणवीस सरकारनं ही योजना बंद केली आहे. नवीन सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात आनंदाचा शिधा योजनेला बगल देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून दसरा, दिवाळी, गुढीपाडवा अशा सणांना रवा साखर, चणा डाळ, तेल अवघ्या १०० रुपयांमध्ये दिलं जायचं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ही योजना सुरु केली होती. पण आता नव्या सरकारनं ही योजना बंद केली आहे. आनंदाचा शिधा योजना बंद होण्यामागचं निश्चित कारण समोर समोर आलेलं नाही. पण या योजनेला लाडकी बहीण योजनेचा फटका बसला असल्याची चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजनांना कात्री लागलेली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या