🌟केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जम्मू काश्मिर मधील दोन संघटनांवर घातली बंदी.....!


🌟केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घोषणा : जम्मू-काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन आणि अवामी कृती समिती या दोन संघटनांना बंदी🌟


नवी दिल्ली :- पाकिस्तान मध्ये दहशतवाद्यांकडून रेल्वे अपहरण झाल्यानंतर भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडून जम्मू काश्मिरमधील दोन बेकायदेशिर संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषीत केला आहे.

पाकिस्तान मधील बलुचिस्तान भागात बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेने जफर एक्सप्रेस ट्रेनच्या अपहरणाची जबाबदारी स्विकारली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) या रेल्वे अपहरणाची जबाबदारी स्वीकारली आहे. बीएलएचा दावा आहे की अपहरण झालेल्या ट्रेममध्ये २१४ पाकिस्तानी सैनिकांसह एकूण ४२६ प्रवासी होते. पाकिस्तानी लष्कराने ही कारवाई संपल्याचे जाहीर केले आहे. यादरम्यान २१ प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले असून चार निमलष्करी दलांचे जवान मारले गेले. लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी कारवाई दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व ३३ बंडखोरांना ठार केले. अपहरण झालेल्या या रेल्वे गाडीत २१४ पाकिस्तानी सैनिकांसह एकूण ४२६ प्रवासी होते. दहशतवाद्यांनी आतापर्यंत ६० सैनिक मारले आहेत, तर १५० अजूनही ओलीस आहेत. या घटनेनंतर आता भारत सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन आणि अवामी कृती समिती या दोन संघटनांना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या एक्स अकाऊंट वर याबद्दल माहिती दिली आहे. या संघटना लोकांना भडकावण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवण्यासाठी जबाबदार असल्याचे आढळून आले आहे, ज्यामुळे देशाची एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते, असे अमित शहा यांनी सांगितले. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन आणि अवामी कृती समिती वर बंदी घातल्याच्या निर्णयावर मेहबूबा मुफ्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुफ्ती यांनी अशा प्रकारे बंदी घालणे चुकीचे आहे असे म्हटले आहे. या सामाजिक-राजकीय संघटना आहेत. भारत सरकार मिरवाईजची प्रतिष्ठा समजून घेते आणि त्यांना झेड सुरक्षा देते आणि नंतर तुम्ही त्यांच्या संघटनेवर बंदी घालता, हे अत्यंत चुकीचे आहे. असा दावा महेबुबा मुफ्ती यांनी केला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या