🌟महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना (उबाठा) गटाचे आ.भास्कर जाधवांच्या नियुक्तीचे संकेत...!


🌟शिवसेना (उबाठा) गटाने विधानसभा अध्यक्षांना दिले पत्र🌟

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार दि.०३ मार्च २०२५ पासून सुरुवात झाली परंतु विधानसभेत विरोधी पक्षनेता होण्याइतकेही संख्याबळ विरोधकांकडे नसता देखील शिवसेना (उबाठा) गट विरोधी पक्षनेतेपदासाठी आग्रही आहे मंगळवार दि.०४ मार्च रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदासाठी आ.भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत ठाकरेंच्या शिवसेनेने आ.भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्रही दिले आहे आता ठाकरे गटाला विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा मान द्यायचा की नाही याचा निर्णय विधानसभाध्यक्षांना घ्यावा लागणार आहे.

अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच विरोधी पक्षनेता कोण होणार, यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जात होता. अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासमवेत अनेक नेत्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.

विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेले संख्याबळ हे महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे नाही. त्यामुळे आतापर्यंत विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावरून अनेक दावे केले जात होते. मविआमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे सर्वाधिक २० जागा असल्याने शिवसेना ठाकरे गटाने यावर दावा केला आहे. अखेर याबाबतचे पत्र दिल्यानंतर आता त्यावर अंतिम निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या