🌟छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवण्याची विहिंप बजरंग दलानं केली मागणी🌟
छत्रपती संभाजीनगर :- औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी अनेक संघटना, राजकीय नेते करु लागले आहेत. औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं दिला आहे. यानंतर आता कबर परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवा, अशी मोहीम विहिंप, बजरंग दलानं शिवजयंतीला हाती घेतील आहे.
त्यामुळे वातावरण तापलं आहे छत्रपती संभाजीनगरात असलेल्या औरंगजेबाच्या कबरीजवळील बंदोबस्त अचानक वाढवण्यात आलेली आहे. या परिसरात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे १५ कर्मचारी, २ पोलीस अधिकारी कबर परिसरात आहेत. कबर परिसरात जाताना २ ठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली आहे. २ ठिकाणी फिक्स पॉईंट उभारण्यात आले आहेत. कबर पाहायला जाणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी केली जात आहे. मगच त्यांना आत सोडलं जात आहे. छावा चित्रपटानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटला. गेल्या काही दिवसांत यावरुन अनेक नेत्यांनी विधानं केली आहेत. औरंगजेबाची कबर हटवण्याची भाषा अनेक राजकीय नेत्यांनी केली आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी या भागात एसआरपीएफची १ तुकडी, १५ पोलीस, २ अधिकारी तैनात केले गेले आहेत. काही पोलीस साध्या वेशातही तैनात आहेत.
0 टिप्पण्या